Share

PSI ANNA GUNJAL । तीन दिवसांपासून नॉट रिचेबल आणि आज सापडला ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह

PSI ANNA GUNJAL यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत असणाऱ्या झाडाला गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

by MHD

Published On: 

PSI ANNA GUNJAL suicide in Lonavala

PSI ANNA GUNJAL। संतोष देशमुख हत्याप्रकरणी (Santosh Deshmukh murder case) संपूर्ण पोलीस यंत्रणेची झोप उडाली आहे. अशातच आता पुणे पोलीस (Pune Police) दलात एक खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका पोलिस उपनिरीक्षकाने टोकाचा निर्णय घेतल्याने पुणे शहर पुरते हादरून गेले आहे.

पोलिस उपनिरीक्षक अण्णा गुंजाळ (Anna Gunjal) यांनी लोणावळ्यातील टायगर पॉईंटलगत असणाऱ्या झाडाला गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. ते खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. परंतु, तीन दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते आणि त्यांचा संपर्कदेखील होत नव्हता. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Anna Gunjal suicide)

अखेर आज त्यांचा शोध लागला आहे परंतु, त्यांनी आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. दरम्यान, याच टायगर पॉइंटवर त्यांची गाडी आणि एक डायरी आढळून आली आहे. या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण लपलेले असावे, असा तर्क पोलिसांकडून लावला जात आहे.

PSI Anna Gunjal suicide in Lonavala

दरम्यान, पोलिसांना ११२ या क्रमांकावर एक कॉल आला आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस घटनास्थळी जाताच त्यांना समोर अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह दिसला. पोलिसांनी शिवदुर्ग मित्र रेस्कू पथकाच्या सदस्यांच्या मदतीने गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला. याप्रकरणी अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही