🕒 1 min read
Maratha Reservation | नाशिक: महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी त्यांनी राज्यात मोठं आंदोलन सुरू केलं आहे. यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी ( Maratha Reservation ) नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारने हाती घेतलं आहे.
जिल्हा पातळीवर हे काम सुरू आहे. अशात नाशिक जिल्ह्यातून महत्वाची बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये हजारो कुणबी ( Maratha Reservation ) नोंदी आढळून आल्या आहेत.
Trimbakeshwar has given blessing to the Maratha community – Manoj Jarange
मराठा आंदोलक मनोज जरांगे महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान ते नाशिकच्या त्रंबकेश्वरमध्ये दाखल झाले. त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतचं त्यांच्या हाती हजारो कुणबी ( Maratha Reservation ) नोंदी लागल्या आहे.
त्र्यंबकेश्वरच्या पुरोहितांनी या नोंदी जरांगे यांना दिल्या आहेत. यावर बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “राज्य सरकारने अभ्यासक पाठवून या नोंदींची पडताळणी करून घ्यायला हवी.
पडताळणी झाल्यानंतर राज्य सरकारने महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) द्यावं. त्र्यंबकेश्वराने मराठा समाजाला हा आशीर्वाद दिला आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये मोठा खजिना सापडला आहे.” या नोंदीनंतर राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण ( Maratha Reservation ) देणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांनी मनोज जरांगे यांना हजारो कुणबी नोंदी दाखवल्या आहे. “या नोंदी आम्ही गावोगावी जाऊन जमा केलेल्या नाही.
या आमच्या आजोबा आणि पंजोबांच्या काळातील नोंदी आहेत. जे लोक त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन घेऊन गेलेले आहे, त्यांच्या या नोंदी आहेत. यामध्ये आमच्याकडे कुणबी म्हणून एक वेगळा भाग आहे.
त्या लोकांनी स्वतःचं नाव लावण्याआधी यामध्ये कुणबी नाव लावलेलं आहे. अशा आमच्याकडे हजारो नोंदी आहेत”, असं त्र्यंबकेश्वर मंदिरातील पुरोहितांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | मराठा आरक्षणावर तोडगा निघणार? बच्चू कडू घेणार CM शिंदेंची भेट
- Manoj Jarange | भुजबळांनी कोणत्या नाटकात आणि चित्रपटात काम केलंय? मला सगळं माहितीये – मनोज जरांगे
- Uddhav Thackeray | खोटं रेटून बोल आणि जुमलेबाजी या मोदी सरकारच्या न वाजणाऱ्या नाण्याच्या दोन बाजू; ठाकरे गटाचं टीकास्त्र
- Weather Update | राज्यात थंडीचा कहर; तर येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता
- Rahul Gandhi | पनौती तिकडे गेला आणि भारत हरला; राहुल गांधींची मोदींवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











