Share

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? 24 तारखेला होणार नियमित सुनावणी

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? असा सवाल उपस्थित झाला आहे. या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. यादरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) गट आणि अजित … Read more

Published On: 

Sharad Pawar | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? असा सवाल उपस्थित झाला आहे.

या प्रकरणाची केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. आज या प्रकरणावर सुनावणी झाली. यादरम्यान शरद पवार ( Sharad Pawar ) गट आणि अजित पवार गट दोघांच्याही वकिलांमध्ये जोरदार खंडाजंगी पाहायला मिळाली.

The next hearing will be held on November 24

आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत सुनावणी पार पडली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खंडजंगी पाहायला मिळाली.

शरद पवार ( Sharad Pawar ) गटाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्र संदर्भात डॉ. अभिषेक सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केल्याचं दिसून आलं.

तर अजित पवार गटाच्या वकिलांनी देखील त्यांची बाजू मांडली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? याबाबत आता पुढील सुनावणी 24 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 4.30 वाजता होणार आहे.

दरम्यान, 02 जुलै 2023 रोजी राज्याच्या राज्यकारणात मोठा भूकंप आला होता. या दिवशी अजित पवार शरद पवारांना ( Sharad Pawar ) सोडून राज्य सरकारमध्ये सामील झाले होते.

राज्य सरकारमध्ये सामील होताच त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( Sharad Pawar ) दोन गट पडलेले असून दोन्ही गटाने पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.

याच याचिकेवर आता निवडणूक आयोगामध्ये सुनावणी सुरू आहे. निवडणूक आयोग नक्की कुणाच्या बाजूने निर्णय देणार? याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही