Share

Weather Update | राज्यात ‘या’ जिल्ह्यात वाढणार थंडीचा जोर, पाहा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातून परतीचा पाऊस मागे फिरला आहे. त्यानंतर ऑक्टोबर हिटने नागरिकांना हैराण केलं होतं. अशात राज्यात थंडीची चाहूल लागल्यामुळे नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळत आहे. राज्यात पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. परंतु, राज्यात यंदा थंडी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. The state … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यातून परतीचा पाऊस मागे फिरला आहे. त्यानंतर ऑक्टोबर हिटने नागरिकांना हैराण केलं होतं.

अशात राज्यात थंडीची चाहूल लागल्यामुळे नागरिकांना उन्हापासून थोडासा दिलासा मिळत आहे. राज्यात पहाटेच्या वेळी गुलाबी थंडी जाणवायला लागली आहे. परंतु, राज्यात यंदा थंडी कमी राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

The state is experiencing cold weather

देशासह राज्यामध्ये गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील बहुतांश भागात पहाटेच्या वेळी थंडी जाणवायला लागली आहे. अशात  दरवर्षीच्या तुलनेत यंदा नोव्हेंबर महिन्यात गारठा कमी राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

यावर्षी नोव्हेंबर महिन्यात देशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर राज्यातील किमान तापमान देखील सरासरीपेक्षा वर राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली (Weather Update) आहे.

परिणामी थंडीचं प्रमाण कमी राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठाणे, मुंबई आणि कोकणातील बहुतांश भागात थंडीचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये ऑक्टोबर महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. अशात मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आली आहे.

त्याचबरोबर दक्षिणेकडील बहुतांश भागासह ईशान्य, पूर्व मध्य आणि पश्चिमेकडील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही