🕒 1 min read
Maratha Reservation | मुंबई: राज्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन अत्यंत पेटलं आहे. आरक्षणासाठी सुरू असलेलं हे आंदोलन हिंसक वळण घेताना दिसत आहे.
राज्यामध्ये जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे. अशात या आंदोलनाची झळ मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरातील गाड्यांची तोडफोड झाली आहे.
मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाली आहे. मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ही तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली आहे.
Hasan Mushrif’s car has been vandalized
मराठा समाज आरक्षण मिळवण्यासाठी (Maratha Reservation) राज्यभर आंदोलन करताना दिसत आहे. त्यांचं हे आंदोलन दिवसेंदिवस तापत चाललं आहे.
जोपर्यंत आरक्षण (Maratha Reservation) मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने स्पष्ट केली आहे. अशात मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.
अजय साळुंखे, संतोष निकम आणि दीपक सहानकोरे या तिघांनी आमदारस्थानी असलेल्या हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली आहे.
हे तिघे छत्रपती संभाजीनगरमधून आले आहे. हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे.
ST bus service stopped from Ratnagiri over Maratha reservation
दरम्यान, आरक्षणाच्या मुद्द्यावरून (Maratha Reservation) मराठा समाज आक्रमक होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात जागोजागी जाळपोळ आणि दगडफेक होताना दिसत आहे.
तर काही ठिकाणी एसटी बस देखील फोडण्यात आल्या आहे. अशात राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून बस सेवा बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाने दिली आहे.
रत्नागिरी विभागातून पुणे, बीड, कोल्हापूर, लातूर, बेळगाव इत्यादी भागांमध्ये जाणाऱ्या बस सेवा बंद करण्यात आल्या आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या बस सेवा बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Maratha Reservation | मराठा आंदोलन भडकलं; दगडफेक आणि जाळपोळीच्या पार्श्वभूमीवर एसटी बसफेऱ्या रद्द
- Weather Update | यंदा थंडी कमीच राहणार; हवामान खात्याने दिला अंदाज
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीसांच्या दिरंगाईमुळे सामान्य नागरिकांना अजून काय सोसावं लागेल? बसनंतर मराठा संघटनांचं रेल्वे रोको आंदोलन
- Maratha Reservation | आंदोलकांना त्रास झाला तर जशासतसं उत्तर दिलं जाईल; मनोज जरांगेचा शिंदे- फडणवीसांना इशारा
- Maratha Reservation | शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय मान्य नाही, त्यांनी उद्याच अधिवेशन बोलवावं; मनोज जरांगे आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











