Share

Eknath Shinde | शिंदे गटाचं ठरलं! यंदा आझाद मैदानावर होणार दसरा मेळावा

🕒 1 min readEknath Shinde | मुंबई: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून दादर येथील शिवाजी पार्कला भव्य मेळावा घेतला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला होता. परंतु, महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वी शिंदे गटानं आपला हा अर्ज मागे घेतला. त्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | मुंबई: दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेकडून दादर येथील शिवाजी पार्कला भव्य मेळावा घेतला जातो. शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेच्या दोन्ही गटांनी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला अर्ज केला होता.

परंतु, महानगरपालिकेच्या निर्णयापूर्वी शिंदे गटानं आपला हा अर्ज मागे घेतला. त्यानंतर शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी ठाकरे गटाला परवानगी मिळाली आहे.

तर दुसरीकडे काल एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Dasra melava of Shinde group will be held at Azad Maidan this year

दसरा मेळाव्याची तयारी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल शिंदे गटाची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहे.

या बैठकीमध्ये शिंदे गटानं दसरा मेळावा घेण्यासाठी दोन मैदानाची निवड केली होती. या पार्श्वभूमीवर मोठी माहिती समोर आली आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानावर होणार आहे. शिंदे गटाच्या मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी व्हावी यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न करण्यात येणार आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी देखील ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली होती. या मेळाव्यामध्ये बोलत असताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा चांगलाच समाचार घेतला होता.

तर एकनाथ शिंदे यांनी देखील उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक शब्दात टीका केली होती. त्यानंतर यंदा देखील दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमने-सामने येताना दिसणार आहे. यावर्षी दोन्ही गटांमध्ये कोणत्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होईल? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!