🕒 1 min read
Vijay Wadettiwar | टीम महाराष्ट्र देशा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी 16 दिवस अन्नत्याग करत उपोषण केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीनंतर जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागं घेतलं.
उपोषण मागे घेतलं असलं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या मागणीला ओबीसी समाजाकडून विरोध दर्शवला जात आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागू देता मराठ्यांना आरक्षण द्या, असं ओबीसी समाजाला म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
The entire Maratha community should be given Kunbi caste certificate from OBC – Manoj Jarange
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यांची ही मागणी संविधानिक नाही.
मराठा समाजाला जर आरक्षण द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी वेगळा प्रवर्ग करून त्यांना आरक्षण द्या. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागू देता त्यांची मागणी पूर्ण करा. त्याला आमचा कोणत्याही प्रकारचा विरोध नाही.
ओबीसीतून आरक्षण देण्याच्या त्यांच्या मागणीला आमचा विरोध आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात बहुमतातील सरकार आहे. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घ्यावा लागणार आहे. आमचा त्या निर्णयाला पाठिंबा असेल.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठा समाजाला आरक्षण देऊ शकतात, असा आम्हाला विश्वास वाटत आहे.
म्हणून मराठा समाजाने मुख्यमंत्री शिंदेंवर विश्वास टाकला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काही वर्षांपूर्वी एका उद्घाटन समारंभासाठी नारायण गडावर आले होते.
मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी नारायण गडावर म्हटलं होतं. मात्र, मराठा समाजाला अद्याप टिकणारं आरक्षण मिळालं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मतदानासाठी मराठा समाजाला गृहीत धरू नये.”
महत्वाच्या बातम्या
- Bacchu Kadu | अपंगांची कामं होत नसतील तर तुमच्या मुख्यमंत्रीपदाला काही अर्थ नाही – बच्चू कडू
- Keshav Upadhye | काँग्रेसचा पुळका आलेल्या पक्षाची उभी हयात त्यांच्या विरोधात गेलीये; केशव उपाध्येंचं ठाकरे गटावर टीकास्त्र
- Sanjay Raut | आदित्य ठाकरेंमुळे CM शिंदेंचा परदेशी दौरा रद्द झालाय – संजय राऊत
- Supriya Sule | चला, आपण धाब्यावर जाऊ; सुप्रिया सुळेंनी भाजपला धारेवर धरलं
- Ajit Pawar | लवकर अजित पवारांना मुख्यमंत्री होऊ दे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं लालबागच्या राजाला साकडं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











