Share

Sanjay Raut | माझी इच्छा झाली तर मी CM शिंदेंच्या पत्रकार परिषदेला जाईल – संजय राऊत

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे. या बैठकीनंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती. या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास देखील मिळाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली … Read more

Published On: 

Sanjay Raut | छत्रपती संभाजीनगर: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळाची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे.

या बैठकीनंतर होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत पत्रकार म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली होती.

या पत्रकार परिषदेसाठी संजय राऊत यांना पास देखील मिळाला असल्याची माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी दिली होती. यानंतर संजय राऊत यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.

I am the most senior editor in Maharashtra – Sanjay Raut

आज सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पोलीस आयुक्तांकडे या मुद्द्याबाबत अधिक माहिती असेल. मी एक संपादक आहे. महाराष्ट्रातील मी सर्वात ज्येष्ठ संपादक आहे. मी पत्रकार आणि वार्ताहर सुद्धा आहे.

माझी इच्छा झाली तर मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला जाईल. मात्र, या पत्रकार परिषदेमध्ये मला अडवायचा प्रयत्न होईल आणि मला गोंधळ नकोय.”

या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात न करता पंचतारांकित हॉटेलमध्ये ठोकला होता. यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर सडकवून टीका केली होती.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मुक्काम पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकेचा टीका घेतल्यानंतर आपला मुक्काम पंचतारांकित हॉटेलमधून शासकीय विश्रामगृहात हलवला आहे.

त्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सर्व आमदारांचं अभिनंदन करतो. छत्रपती संभाजीनगरमधील त्यांनी सर्व हॉटेल्स आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. त्या सर्वांचे पेमेंट देखील झालं होतं.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही