🕒 1 min read
Sharad Pawar | पुणे: अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसले आहे.
अशात आज वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासोबत अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवारांनी या बैठकीला पाठ फिरवली आहे.
Ajit Pawar and Sharad Pawar should meet
आज (15 सप्टेंबर) पुण्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
तर कार्यकारी मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, अजित पवारांनी या बैठकीला जाणं टाळलं आहे.
अजित पवारांनी दुसऱ्यांना शरद पवारांसोबतच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. अशात अजित पवार आणि शरद पवार यांचं मनोमिलन व्हावं, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटवर अजित घुले यांच्याकडून एक बॅनर लावण्यात आलं आहे. हे बॅनर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
‘लहान तोंडी मोठा घास, महाराष्ट्राला आपल्या मनोमिलनाची आस’, असं या बॅनरवर नमूद करण्यात आलं आहे. आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहोत.
त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकच आहे. आमच्यासारखे कार्यकर्त्यांना अजित पवार आणि शरद पवार यांचं नेतृत्व हवं आहे, असं अजित घुले (Ajit Ghule) यांनी म्हटलं आहे.
अजित घुले यांच्या या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार काय प्रतिक्रिया देतील? याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | शरद पवारांसोबतच्या बैठकीला अजित पवारांनी फिरवली पाठ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Eknath Khadse | मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत आजचं मरण उद्यावर ढकललं – एकनाथ खडसे
- Uddhav Thackeray | मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल ठरली; ठाकरे गटाची मोदींवर टीका
- Ajit Pawar | काका-पुतणे आमने-सामने! रोहित पवारांच्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांचे सडेतोड उत्तर
- Vijay Wadettiwar | ट्रीपल इंजिन सरकारला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचा डब्बा जड जातोय – विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











