Share

Maratha Reservation | आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही – मनोज जरांगे

🕒 1 min readMaratha Reservation | जालना: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस आहे. मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन कायम सुरू आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी मुंबईहून जालन्याला रवाना झाले आहे.Related News … Read more

Published On: 

🕒 1 min read

Maratha Reservation | जालना: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं जालना जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू आहे. आज त्यांच्या उपोषणाचा सतरावा दिवस आहे.

मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन कायम सुरू आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मनोज जरांगे यांची भेट घेण्यासाठी मुंबईहून जालन्याला रवाना झाले आहे.

याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

I will not leave without reservation – Manoj Jarange

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगे म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला भेटायला येत आहे. या भेटीनंतर आरक्षण मिळेल की नाही याबद्दल मी आता काही सांगू शकत नाही.

मात्र, मी आरक्षण घेतल्याशिवाय (Maratha Reservation) सोडणार नाही एवढेच मी सध्या सांगू शकतो. मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद खोलीत चर्चा करणार नाही.

त्यांची आणि माझी चर्चा प्रसारमाध्यमांसमोरच होईल. सर्वांच्या समोर आमची चर्चा होणार आहे. यामुळे समाजाचा आत्मविश्वास वाढेल. म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची मागणी केली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, “आमचं आंदोलन यशस्वी ठरलं आहे, हे आता म्हणता येणार नाही. जेव्हा सरकार आमच्या हातात पत्र देईल त्या दिवशी आमची ही लढाई यशस्वी ठरेल.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अत्यंत धाडसी आहे. त्याच विश्वासाने मी बोलत आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता आहे. मुख्यमंत्र्यांनी समाजाला प्रबोधन केलं तर समाजाला एक चांगला संदेश मिळू शकतो.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!