🕒 1 min read
Maratha Reservation | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचं तीव्र आंदोलन सुरू आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस आहे.
राज्य सरकार मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, मनोज जरांगे आपल्या निर्णयावर ठाम आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जरांगे यांनी कालपासून औषध आणि पाण्याचं सेवनही बंद केलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
CM Eknath Shinde has called an all party meeting today
मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
या बैठकीमध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांची मत जाणून घेतली जाणार आहे. आज संध्याकाळी 6.30 वाजता सह्याद्री अतिथिगृह येथे ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीला ठाकरे गटाकडून विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. तर शरद पवार गटाकडून राजेश टोपे उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, वंशावळी कुणबी असणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, वंशावळीच्या फेऱ्यात न अडकता राज्य सरकारने सरसकट मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती.
यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र, सरकारचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहे.
कालपासून मनोज जरांगे यांनी पाणी आणि औषधाचा देखील त्याग केला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर (Maratha Reservation) लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | मोदींच्या लुच्चेगिरीची 9 वर्ष देशाच्या नाकीनऊ आणणारी ठरली; ठाकरे गटाचा मोदींवर हल्लाबोल
- Cabinet Expansion | राजकीय हालचालींना वेग; राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली?
- Maratha Reservation | मराठा समाजाने माझ्या शब्दाच्या पुढे जाऊ नये – मनोज जरांगे
- Ajit Pawar | ओबीसी आरक्षणाला धक्का लागत असताना अजित पवार शांत का? – प्रकाश शेंडगे
- Narendra Modi | PM मोदींसमोरील G-20 परिषदेतील नामफलक सोशल मीडियावर व्हायरल; नक्की काय आहे प्रकरण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











