Share

Deepak Kesarkar | मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमागे कट असण्याची शक्यता – दीपक केसरकर

🕒 1 min readDeepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये गेल्या अकरा दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.Related News for You‘लाडकी बहीण योजना बंद करा, पण…’; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला … Read more

Published On: 

🕒 1 min read

Deepak Kesarkar | टीम महाराष्ट्र देशा: जालना जिल्ह्यामध्ये गेल्या अकरा दिवसांपासून मराठा समाजाचं आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. या घटनेनंतर राज्याचं राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. याच पार्श्वभूमीवर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दुसऱ्या कुणीतरी तिथे येऊन दगडफेक केली आहे. त्यामुळे पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी कट असण्याची शक्यता आहे, असं दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.

दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले, “आरक्षणासाठी मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मोर्चे निघालेले आहे. मात्र, या मोर्चामध्ये कधीही दगडफेक झालेली नाही आणि ही वस्तुस्थिती आहे.

जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनातील उपोषणकर्त्याच्या तब्येतीला काही होऊ नये, म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करा. एवढाच तो मुद्दा होता. उपोषणकर्त्यांना रात्री रुग्णालयात दाखल करू असं आंदोलकांकडून सांगण्यात आलं होतं.

दुसऱ्या दिवशी प्रशासनाचे अधिकारी मनोज जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी उपोषण स्थळी दाखल झाले होते. त्यावेळी मराठा समाजाने दगडफेक केली नाही.

त्या ठिकाणी दुसऱ्या कोणीतरी येऊन त्यांनी दगडफेक केली आहे. म्हणून पोलिसांनी लाठीमार केला. म्हणजे यामागे काहीतरी कट असण्याची शक्यता आहे.

We are worried about the health of Manoj Jarange – Deepak Kesarkar

यावेळी बोलत असताना त्यांनी (Deepak Kesarkar) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या प्रकृतीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आम्हाला मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची काळजी आहे.

आम्हाला त्यांच्या तब्येतीची काळजी होती, म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितलं होतं. त्यांची एक किडनी कमकुवत आहे. त्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी सांगत होतो.

मनोज जरांगे एक अत्यंत चांगले कार्यकर्ते आहे. गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक कार्य करत आहे. त्यांच्या तब्येतीला काही होऊ नये हीच आमची भावना आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!