🕒 1 min read
Radhakrishna Vikhe Patil | सोलापूर: जालना जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहे. काहीही झालं तरी उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात निर्णय घेतलेला असून मनोज जरांगे यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती.
यानंतर राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा मुद्दा जास्त ताणू आये, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
सोलापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत असताना राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, “काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुणबी मराठा आरक्षणाबाबत धोरण स्पष्ट केलं आहे.
ज्या मराठ्यांकडे निजामशाहीच्या काळातील कुणबी असल्याचे पुरावे आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात देखील झाली आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांची प्रमुख मागणी पूर्ण केली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी हा विषय जास्त ताणू नये.”
Government’s decision is of no use to us – Manoj Jarange
दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयावर मनोज जरांगे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आमचे सहकारी अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र, तरीही शांततेत आमचं उपोषण सुरू आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निर्णय घेतला आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो. परंतु सरकारचा हा निर्णय आमच्या काहीच उपयोगाचा नाही.
म्हणून सरकारनं वंशावळी नोंदी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय मागे घ्यावा. संपूर्ण मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्याचा निर्णय सरकारने जाहीर करावा. कारण आमच्याकडे वंशावळीचे दस्तावेज नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde | मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे – पंकजा मुंडे
- Sharad Pawar | शरद पवार ॲक्शन मोडमध्ये; सर्व आमदार-खासदारांना तातडीनं मुंबईत बोलावलं
- Maratha Reservation | सरकारच्या निर्णयाचा आम्हाला काहीच उपयोग नाही – मनोज जरांगे
- Supriya Sule | अजित दादा पुन्हा राष्ट्रवादीत येतील का? सुप्रिया सुळे म्हणाल्या…
- Sanjay Raut | सनातन धर्माबाबत उदयनिधी स्टॅलिन यांचं वैयक्तिक मत असू शकतं – संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











