Share

Vinayak Raut | शिंदे-फडणवीस सरकार मराठा समाजाचे मारेकरी – विनायक राऊत

Vinayak Raut | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी असल्याचं विनायक राऊत … Read more

Published On: 

Vinayak Raut | मुंबई: जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असताना आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. या घटनेचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात देखील दिसून आले आहे.

या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

The state and central government are ignoring the Maratha community – Vinayak Raut 

प्रसार माध्यमांशी बोलत असताना विनायक राऊत (Vinayak Raut) म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार हे मराठा समाजाचे मारेकरी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे.

यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार काम करत आहे. महाराष्ट्रातील मराठा आणि धनगर समाजाकडं अत्यंत वाईट दृष्टीनं बघितलं जात आहे.

राज्य आणि केंद्र सरकार मराठा समाजाची अवहेलना करत आहे. उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीचा निषेध केला आहे. मराठा समाजाला जर खरंच आरक्षण द्यायचं असेल तर येणाऱ्या अधिवेशनात त्या संदर्भात विधेयक आणावं लागेल.

दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जालना जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले आहे.

वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवून आणि दबाव टाकून मनोज जरांगे झुकले नाही. यासाठी त्यांचं कौतुक आहे. ही लोकं 50 खोक्याने विकली जाणार नाही.

आरक्षणासाठी आंदोलन करणारी माणसं गरीब आणि साधी आहेत. ती न्यायासाठी लढत आहे. ते खोक्यांसमोर झुकणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही