🕒 1 min read
Eknath Khadse | जळगाव: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बहुतांश नेत्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे.
यानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्ष बांधणीला सुरुवात केली आहे. अशात शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे भारतीय जनता पक्षाला मोठा झटका देण्याच्या तयारीत आहे.
भाजपचे माजी खासदार आणि माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करू इच्छितात, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. एकनाथ खडसे यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
Around 50 thousand people will attend today’s meeting – Eknath Khadse
आज (05 सप्टेंबर) जळगाव जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या या सभेपूर्वी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी त्यांनी मोठं विधान केलं आहे. एकनाथ खडसे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि माजी खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू इच्छितात. त्यांनी स्वतः याबद्दल मला सांगितलं आहे.
जळगावमध्ये कोल्हापूर, बीड आणि नाशिकपेक्षा मोठी सभा घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आज होणाऱ्या सभेला साधारण 50 हजार लोक उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे.
जळगावमध्ये होणाऱ्या या सभेला शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, सुनील भुसारा, अनिल देशमुख आदी नेते देखील उपस्थित राहणार आहे.”
यावेळी बोलत असताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शरद पवार यांच्या जळगावमध्ये होणाऱ्या सभेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “जळगाव जिल्ह्यातील लोकांची शरद पवार यांच्यावर श्रद्धा आहे.
त्याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील लोकांनी कायम शरद पवारांना पाठिंबा दिला आहे. मधल्या काळात या ठिकाणी भाजपने थोडी मुसंडी मारली होती.
पण त्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकवर आला आहे. मागच्या कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जळगाव जिल्ह्यात सहा आमदार निवडून आले होते.
त्याचबरोबर या ठिकाणच्या अनेक सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, त्यामुळं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | मराठा समाजाची आणखी किती फसवणूक करणार? संजय राऊतांचा राज्य शासनाला सवाल
- Pravin Darekar | उद्धव ठाकरेंसारख्या घर कोंबड्यानं फडणवीसांची लायकी काढू नये – प्रवीण दरेकर
- Vijay Wadettiwar | जीवात जीव असेपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही – विजय वडेट्टीवार
- Maratha Reservation | मराठा आंदोलन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे घेणार आज मोठा निर्णय
- Uddhav Thackeray | मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे खोटं बोलण्यात वस्ताद; ठाकरे गटाचा राज्य सरकारवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











