Share

Aditya Thackeray | ये डर अच्छा है; सिनेट निवडणुकांवरून आदित्य ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

🕒 1 min readAditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूका अचानक रद्द केल्या आहे. रातोरात या निवडणुका रद्द करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. तर या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्य सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: राज्य सरकारनं मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणूका अचानक रद्द केल्या आहे. रातोरात या निवडणुका रद्द करण्यात आल्यामुळं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.

तर या मुद्द्यावरून ठाकरे गटानं राज्य सरकारला चांगलं धारेवर धरलं आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. भीतीपोटी मिंधे-भाजप सरकारनं या निवडणुका रद्द केल्या असल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Yeh Dar Achcha Hai – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे म्हणाले, “मिंधे-भाजप सरकारनं त्यांच्या बेकायदेशीर आणि भ्रष्ट राजवटीसाठी जनतेचा जनादेश गमावला आहे. मात्र, ये डर अच्छा है.

परंतु लोकशाही रद्द करणं हे आपल्या देशासाठी चांगलं नाही. देशभक्त म्हणून आम्ही या राजवटीचा सामना करणार आहोत. मिंधे-भाजप सरकार निवडणूकांना एवढं घाबरलेलं आहे की त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका रद्द केल्या.”

दरम्यान, या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले, “राज्य सरकारने अचानक या निवडणुका रद्द केल्या आहे.

मात्र, यामध्ये कोणत्याही प्रकारचं आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. कारण सध्याचं सरकार कोणत्याच निवडणुका घ्यायला तयार नाही. परंतु सरकार किती निवडणुका रद्द करेल?

उद्या भीतीपोटी ते लोकसभा आणि विधानसभा निवडणुका देखील रद्द करतील का? सरकारनं भीतीपोटी सिनेट निवडणुका रद्द केल्या आहे.

या निवडणुकांसाठी आमची पूर्ण तयारी झालेली होती. आम्ही या निवडणुका जिंकू म्हणून राज्य सरकारनं या निवडणुका रद्द केल्या आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!