Share

Sambhaji Bhide | संभाजी भिडे यांच्या अडचणीत वाढ! भिडेंच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल

Sambhaji Bhide | मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं भिडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर कुमार महर्षी (Kumar Maharshi) यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात मुंबई … Read more

Published On: 

Sambhaji Bhide | मुंबई: शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

महात्मा गांधीजींचे खरे वडील एक मुस्लिम जमीनदार असल्याचं भिडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

याच पार्श्वभूमीवर कुमार महर्षी (Kumar Maharshi) यांनी संभाजी भिडे यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठांसमोर आज या याचिकेवर सुनावणी होणार असल्याचं बोललं जात आहे.

संभाजी भिडे (Sambhaji Bhide) जातीय आणि सामाजिक एकोपा नष्ट करत आहे. महात्मा फुले, महात्मा गांधी, साईबाबा इत्यादींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून संभाजी भिडे त्यांची बदनामी करत आहे.

अनेकदा जाणीवपूर्वक अशी वादग्रस्त वक्तव्य केली जातात. या वक्तव्यामुळे देशातील सामाजिक आणि धार्मिक एकोपा नष्ट होताना दिसत आहे.

त्याचबरोबर अशा विधानांमुळे लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे न्यायालयाने अशी वक्तव्य करण्यापासून त्यांना मनाई करावी, असं या याचिकेमध्ये म्हटलं आहे.

Mahatma Gandhi’s real father is a Muslim landlord – Sambhaji Bhide

दरम्यान, संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. “करमचंद गांधी हे महात्मा गांधीजींचे खरे वडील नाही.

त्या काळात करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामासाठी होते. एक दिवस करमचंद गांधी त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले.

त्यानंतर त्या मुस्लिम जमीनदाराने त्यांच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले. त्यानंतर त्या जमीनदाराने त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला.

म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे”, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही