Devendra Fadnavis | अजित पवार मुख्यमंत्री होणार? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadnavis | मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची आज विधानसभा विरोधी पक्षनेते निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला … Read more

Published On: 

Devendra Fadnavis | मुंबई: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची आज विधानसभा विरोधी पक्षनेते निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.

यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

राज्य सरकारमध्ये आता कोणताही बदल होणार नाही. आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच पदावर राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde is a hero – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 2019 मध्ये एक विक्रम केला आहे. त्यावर्षी त्यांनी सत्ता परिवर्तन करून ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले.

त्यानंतर ते उत्कृष्ट पद्धतीनं काम करत आहे. म्हणून एकनाथ शिंदे हिरो आहे. मात्र, अजित पवार (Ajit Pawar) हे 2019 चे खरे हिरो आहे. त्यावर्षी अजित पवार आधी माझ्यासोबत उपमुख्यमंत्री झाले.

त्यानंतर ते महाविकास आघाडीमध्ये उपमुख्यमंत्री झाले. मग त्यांनी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी सांभाळली आणि आता ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले आहे. म्हणून अजित पवार हे 2019 मधील खरे हिरो आहे.

पुढे बोलताना ते (Devendra Fadnavis) म्हणाले, “अजित पवार यांच्यानंतर माझा नंबर लागतो. कारण मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. त्यानंतर मी विधानसभा विरोधी पक्षनेता पदाची जबाबदारी सांभाळली.

तर सध्या मी उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहे. यामध्ये आता कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही. आम्ही ज्या पदावर आहोत, त्याच जबाबदाऱ्या आम्ही सांभाळणार आहोत.”

दरम्यान, अजित पवार सत्तेत सामील झाल्यानंतर ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार लवकरच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करत खळबळ उडवून दिली होती.

त्याचबरोबर अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील म्हटलं होतं. अशात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या वक्तव्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही