Uddhav Thackeray | “पक्ष सोडून गेलेल्या लोकांकडून एकच अपेक्षा…”; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे. आज उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला चांगलं सुनावलं आहे. ठाकरे गटातून जे गेले त्यांना आता जय महाराष्ट्र, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं … Read more

Published On: 

Uddhav Thackeray | मुंबई: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे दोन गट पडले होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहे.

आज उद्धव ठाकरेंनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला चांगलं सुनावलं आहे. ठाकरे गटातून जे गेले त्यांना आता जय महाराष्ट्र, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Let those who want to go – Uddhav Thackeray

आज सायन विधानसभा मतदारसंघात बोलत असताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, “ज्यांना जायचं आहे त्यांना जाऊ द्या, हे मी आधीपासूनच सांगत आलो आहे.

कुणीतरी आपल्याला सोडून गेल्यानंतरच आपल्या सागराला जास्त उधाण येतं, ते उधाण राग, त्वेष आणि जिद्दीचं असतं. त्याचबरोबर कुणी आपल्याला सोडून गेल्यावर आपली जिंकायची इच्छा आणखीन वाढते.

प्रत्येक वेळी टीका करत असताना त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल बोलायचं असतं. एवढं सगळं होऊन देखील शिवसेना आणि उद्धव ठाकरे संपत नाही? असा त्यांना प्रश्न पडला असावा.”

पुढे बोलताना ते (Uddhav Thackeray) म्हणाले, “जे आपल्याला सोडून गेले आहे, त्यांना आता जय महाराष्ट्र. जे शिंदे गटात गेले आहे, त्यांचा आणि आपला संबंध तुटला आहे.

ज्या लोकांनी (शिंदे गट) आपल्यासोबत गद्दारी केली आहे, त्यांनी आता तिकडे जाऊन गद्दारी करू नये एवढीच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी त्या पक्षाच्या विरोधात जाऊन काम करू नये. त्यांनी जर असं केलं तर एक शिवसैनिक म्हणून आपल्याला त्या गोष्टीकडं बघावं लागेल.”

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही