Share

Supriya Sule – कमी मार्काने पास झालो हे जाहिरातीतून सांगणारा एकनाथ शिंदेंचा पहिलाच पक्ष – सुप्रिया सुळे

Supriya Sule – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. कमी मार्काने पास झालो हे कबूल करणारा हा पहिला पक्ष आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी जाहिरातीची खिल्ली उडवली. जाहिरातीद्वारे महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. मविआच्या … Read more

Published On: 

Supriya Sule – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज सर्व प्रमुख वर्तमानपत्रात छापून आलेल्या जाहिरातीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्कील टिप्पणी केली. कमी मार्काने पास झालो हे कबूल करणारा हा पहिला पक्ष आहे, अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी जाहिरातीची खिल्ली उडवली.

जाहिरातीद्वारे महाविकास आघाडीचे सुगीचे दिवस आले असल्याचे सत्ताधाऱ्यांनी दाखवून दिले आहे. मविआच्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ आणि सत्तेत असलेल्या सरकारचे अपयश वर्तमानपत्रातील जाहीरातबाजीवरून दिसतेय, असे त्या म्हणाल्या. २०२४ मध्ये महाविकास आघाडीचे रयतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागावे, असे आवाहनही सुप्रिया सुळेंनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना केले आहे.

रयतेचे राज्य आणण्यासाठी सर्वांनी तयारीला लागा – सुप्रिया सुळे

 

Eknath Shinde Forgot Balasaheb Thackeray – Ajit Pawar

अजित पवार म्हणाले (Ajit Pawar), “एकनाथ शिंदे एवढ्या लवकर कसं काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले? काय माहित. शिंदे गट म्हणतो आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत. मात्र त्या जाहिरातीमध्ये कुठेही बाळासाहेबांचा फोटो नाही.”

“एकनाथ शिंदे यांनी ही जाहिरात करून स्वतःचं हसू करून घेतलं आहे. लोकप्रियता दाखवण्यासाठी सत्ताधारी पक्ष स्वतःमध्ये स्पर्धा करत आहे. तुम्हाला जर खरंच जनतेचं मत जाणून घ्यायचा असेल, तर उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर करा”

उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण? या संदर्भात एक जाहिरात छापण्यात आली होती. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून पसंती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही