Share

Sanjay Raut | धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं; संजय राऊतांची टीका नेमकी कुणावर?

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काल माध्यमांनी संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र चालवलं … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नेहमी आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. काल माध्यमांनी संजय राऊत यांना श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांच्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी संजय राऊत थुंकले आणि मग त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे.

Spitting is better than peeing in dams

संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या थुंकण्याच्या कृत्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत यांनी बोलताना संयम राखला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले होते. अजित पवार यांच्या या प्रतिक्रियेला उत्तर देत संजय राऊत म्हणाले, “धरणांमध्ये मुतण्यापेक्षा थुंकणं चांगलं.”

पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मी माझ्या पक्षासोबत ठामपणे उभा आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचे विचार कधीच येत नाही. त्याचबरोबर भाजपसोबत जाण्याचा आम्ही कधीच विचार करत नाही.”

शिवसेना-भाजप संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या या कृत्यानंतर आक्रमक झाले आहे. हा वाद वाढल्यानंतर राऊतांनी सावरासावर करण्याचा प्रयत्न केला आहे.”मी माझ्या घरात होतो. माझ्या जिभेला त्रास झाला म्हणून मी थुंकलो. मात्र, मी त्यांच्या नावाने थुकलो असं जर कोणाला वाटत असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही