Share

MPSC Recruitment | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

🕒 1 min read MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून … Read more

Published On: 

🕒 1 min read

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: एमपीएससीच्या परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

एमपीएससी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (MPSC Recruitment) विविध पदांच्या एकूण 154 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, महाराष्ट्र वैद्यकीय विमा सेवा गट अ, निरीक्षक/अधीक्षक दिव्यांग गट ब, प्रशासकीय अधिकारी गट ब, अभिरक्षक गट ब, सहायक संचालक गट ब पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (MPSC Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (MPSC Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मे 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://mpsconline.gov.in/candidate

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://mpsc.gov.in/

जाहिरात पाहा (View Ad)

https://drive.google.com/file/d/167fbMmG8F4keDS0-kvj-keYKx5yIRX82/view

https://drive.google.com/file/d/1Z21Uq1UxZEPI3lIcM_KI6tq-50g8Es5P/view

https://drive.google.com/file/d/1C_V7WmvWpnLnw3YTDzgJUJVRBWJMorY1/view

https://drive.google.com/file/d/1N0MDcoghDSl6DwQelz1E4uxd2q6f5BMK/view

https://drive.google.com/file/d/1iSljf1ea2aGDXJ93YNeNzcaIFtNYrtqK/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही