प्रतिनिधी, 15 ऑक्टोबर: राज्य शासनाच्या कामगार विभागांतर्गत झालेल्या कामगार निरीक्षक गट-क परीक्षेतील गैरप्रकारांच्या आरोपांवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) अधिकृत स्पष्टीकरण दिले आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलेल्या दाव्यानंतर आयोगाने लेखी खुलासा करत, सदर परीक्षा आम्ही घेतलीच नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कामगार आयुक्तालयातील निरीक्षक गट-क सरळसेवा पदासाठी २९ आणि ३० जुलै २०२६ रोजी परीक्षा पार पडली होती. या परीक्षेमध्ये गैरप्रकार झाल्याचा गंभीर आरोप लोकप्रतिनिधी सुषमा अंधारे यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. अंधारे यांच्या या दाव्याची समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली होती.
सोशल मीडियावरील या चर्चेची तातडीने दखल घेत एमपीएससी प्रशासनाने लेखी स्वरूपात वस्तुस्थिती मांडली. आयोगाने स्पष्ट केले आहे की, उपरोक्त परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रक्रियेशी आयोगाचा कोणताही संबंध नाही. अलीकडेच पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे एमपीएससीवर बरीच टीका झाली होती, त्या पार्श्वभूमीवर हा खुलासा समोर आला आहे. आयोगाने आरोप फेटाळल्यानंतर आता सुषमा अंधारे यावर काय बोलणार, याकडे लक्ष लागले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- सलमान खानच्या ‘त्या’ हट्टामुळे ‘कुछ-कुछ होता है’च्या सेटवर ढसाढसा रडला होता करण जोहर
- बॉलिवूडमध्ये ‘हिंदूफोबिया’; धर्माबाबत निर्माती एकता कपूरचे वादग्रस्त विधान
- शासनाच्या १०८ आणि १०२ रुग्णवाहिका सेवांचे एकत्रीकरण; वर्षअखेरीपर्यंत ४,५०० नव्या गाड्या सेवेत दाखल होणार
Ask Maharashtra Desha
आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








