Job Opportunity | नागपूर वायुसेना विद्यालयाच्या आस्थापनेवरील ‘या’ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात वायुसेना विद्यालय (Air Force Academy), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक … Read more

Published On: 

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध संस्था युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत असते. अशात वायुसेना विद्यालय (Air Force Academy), नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

वायुसेना विद्यालय, नागपूर यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) 23 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पीजीटी, टीजीटी, पीआरटी, एनटीटी, लिपिक, लॅब अटेंडंट आणि मदतनीस पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे.  इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

मुख्याध्यापक, वायुसेना शाळा, वायुसेना नगर, नागपूर, पिनकोड- 440007

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1VTXR_Upde3eK_XKoGdny2U0_HEUAahlv/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://nmk.co.in/air-force-school-nagpur-nmk-recruitment-2023/www.airforceschoolvsnnagpur.org

महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

पत्रकार

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही