Share

Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध

🕒 1 min readJob Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत विविध पदांच्या …

पुढे वाचा

Published On: 

🕒 1 min read

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: दादरा आणि नगर हवेली येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. त्याचबरोबर या पदांसाठी उमेदवारांकरिता थेट मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.

राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया (Job Opportunity) राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमध्ये वैद्यकीय अधिकारी/जीडीएमओ, स्टाफ नर्स, MPW, सपोर्ट स्टाफ, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प समन्वयक आणि HMIS व्यवस्थापक पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने पुढील पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांना दिनांक 9 मार्च 2023 रोजी पुढील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

डिस्पॅच विभाग, सीएचसी मोती दमण, दमण U.T. DNH आणि DD

मुलाखतीसाठी पत्ता (Address for interview)

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी, DNH, सिल्वासा.

अधिकृत वेबसाईट (Official website)

http://dnh.nic.in/

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1IFkIh4Eak9_rGFpvYLfkZ2yMCcjSdtXj/view

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Job Education

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या