Narayan Rane | “माझ्या नादी लागू नये, नाहीतर मी पुण्यात येऊन तुमचे बारा वाजवेन”; राणेंचा अजितदादांना इशारा

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit BPawar) यांनी  पुण्याच्या प्रचारसभेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावरुन आता अजित पवार आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. “ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण … Read more

Published On: 

Narayan Rane | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit BPawar) यांनी  पुण्याच्या प्रचारसभेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan rane) यांच्यावर टोलेबाजी केली होती. यावरुन आता अजित पवार आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

“ज्या ज्या नेत्यांनी शिवसेना सोडली, ते सर्व नेते निवडणुकीत हरले आहेत. नारायण राणे हे जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले होते, ते तर दोनवेळा निवडणुकीत हरले. वांद्रे येथे तर एका बाईने नारायण राणेंना हरवलं, अशी टोलेबाजी अजित पवारांनी केली. अजित पवारांच्या या टोलेबाजीला नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“माझ्या नादी लागू, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवेन”

“अजितदादाला बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळतं, हे मला माहीत नाही. खरं म्हणजे मला त्याच्याबद्दल बोलायचंच नाही. तो ज्याप्रकारचा राजकारणी आहे, त्याबद्दल बोलूच नये. बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे घालायला जाऊ नये. दुसऱ्यांना नावं ठेवू नये. माझ्या फंद्यात पडू नका, नाहीतर मी पुण्याला येऊन बारा वाजवेन”, असा थेट इशारा नारायण राणेंनी अजित पवारांना दिला आहे.

“महिला असो वा पुरुष असो, उमेदवार हा उमेदवारच” (Narayan rane Criticize Ajit Pawar)

“माझं पहिलं कार्यक्षेत्र मुंबई आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी मला कोकणात पाठवलं. तिकडून मी सलग सहा वेळा निवडून आलो. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना सोनिया गांधींनी मला वांद्रे येथून निवडणूक लढवण्यास सांगितलं. त्यांच्या म्हणण्यानुसार मी निवडणुकीसाठी उभा राहिलो. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो. पण महिला असो वा पुरुष असो… उमेदवार हा उमेदवार असतो.”, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं वक्तव्य केलं आहे. “नारायण राणेंनी शिवसेना सोडली. सगळे पडले. नारायण राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना बाईनं”, असं अजित पवार म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या-

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही