🕒 1 min read
मुंबई – नात्यांचे धागे कधी जुळतात तर कधी तुटतात, पण तुटलेले धागे पुन्हा एकत्र येतात तेव्हा भुवया उंचावणं साहजिकच आहे. असंच काहीसं घडलंय क्रिकेट आणि ग्लॅमर विश्वातील एका चर्चित जोडीबाबत. २०२५ मध्ये घटस्फोट घेऊन वेगळे झालेले भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि डान्सर धनश्री वर्मा (Dhanashree Verma) अचानक एकत्र दिसल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
गेल्या वर्षभर ज्यांनी एकमेकांचं तोंडही पाहिलं नव्हतं, ते दोघे तब्बल ११ महिन्यांनी एकाच फ्रेममध्ये दिसले आहेत. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ सुसाट व्हायरल होतोय, ज्यात चहल आणि धनश्री तोंडाला मास्क लावून प्रवास करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ समोर येताच नेटकऱ्यांनी तर्कवितर्कांना उधाण आणलंय. हे पॅचअप आहे की अजून काही? हा प्रश्न सर्वांना पडलाय.
Yuzvendra Chahal and Dhanashree Verma reunite
ही भेट जुन्या प्रेमासाठी नसून करिअरच्या नव्या इनिंगसाठी असल्याची कुजबूज इंडस्ट्रीत सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच सुरू होणाऱ्या ‘द 50’ (The 50) या बहुचर्चित रिअॅलिटी शोमध्ये ही जोडी स्पर्धक म्हणून सहभागी होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा शो १ फेब्रुवारी २०२६ पासून जिओ हॉटस्टार आणि कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. निर्मात्यांनी अद्याप यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलेलं नाही, पण ‘धुर शिवाय आग लागत नाही’, असं म्हणतात ना! तसंच काहीसं चित्र सध्या दिसतंय.
२०२० च्या लॉकडाऊनमध्ये फुललेलं हे प्रेम २०२५ मध्ये संपुष्टात आलं होतं. ४ वर्षांच्या संसारानंतर त्यांच्यात मिठाचा खडा पडला आणि त्यांनी घटस्फोट घेतला. चाहते या बातमीने निराश झाले होते. पण आता ११ महिन्यांनंतर पुन्हा एकदा ही जोडी पडद्यावर एकत्र दिसणार असेल, तर तो टीआरपीचा मोठा धमाका ठरेल, यात शंका नाही. हे रियुनियन प्रेमाचं आहे की फक्त शोपुरतं? हे १ फेब्रुवारीलाच स्पष्ट होईल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘९ वर्षे निवडणुका नाहीत तर कंठ कसा फुटणार?’; दादांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार!
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










