नाना पाटेकर की कॅप्टन स्मित मच्छर? विद्याविहार जोडपुलाच्या नामकरणावरून राजकारण तापले, महापौरांची भूमिका स्पष्ट

विद्याविहार जोडपुलाला नाव देण्यावरून भाजप आणि ठाकरे गटात वाद सुरू झाला असून, महापौर रितू तावडे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Published On: 

MHD LOGO

मुंबई, 15 ऑक्टोबर: मुंबईतील विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडपुलाचे काम पूर्ण झाले असून त्याच्या उद्घाटनापूर्वीच नामकरणावरून राजकीय वाद उफाळून आला आहे. या पुलाला कुणाचे नाव द्यायचे यावरून भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आमनेसामने आले आहेत.

भाजपचे आमदार पराग शहा यांनी या उड्डाणपुलाला 'कॅप्टन स्मित मच्छर' यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाचे शिवसैनिक प्रकाश वाणी यांनी ज्येष्ठ अभिनेते व समाजसेवक दिवंगत नाना पाटेकर यांचे नाव या पुलाला दिले जावे, अशी मागणी लावून धरली आहे. याच मागणीसंदर्भात ठाकरे गटाच्या प्रतिनिधींनी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली.

पुलाच्या नामकरणावरून दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर महापौर रितू तावडे यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विरोधकांनी या मुद्द्याचे राजकारण करू नये, असे आवाहन करत या पुलाला कोणाचे नाव द्यायचे याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपण एकत्र बसून घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

जोडपुलाच्या उद्घाटनाबाबत माहिती देताना महापौर म्हणाल्या की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळी दौऱ्यावर असल्याने उद्घाटनासाठी आणखी दोन दिवस लागतील. पूल पूर्णपणे तयार असून लवकरच त्याचा उद्घाटन सोहळा पार पडेल.

यावेळी त्यांनी मुंबईतील पाणीबाणी आणि पोलिसांच्या घरांच्या प्रश्नावरही भाष्य केले. मुंबईवर दुष्काळाचे सावट असून सध्या १० टक्के पाणीकपात लागू आहे. धरणांची पाहणी करण्यात आली असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, मात्र त्यांना पाण्याची चिंता करण्याचे कारण नाही, असा दिलासा त्यांनी दिला.

यासोबतच पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण आग्रही असल्याचेही त्यांनी सांगितले. लवकरच त्यांच्या घरांची पाहणी केली जाणार असून पोलिसांसाठी नवीन घरे बांधून देण्याबाबत सध्या विचार सुरू असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या पुलाचे उद्घाटन कधी होणार आणि नामकरणाचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

विद्याविहार पूर्व-पश्चिम जोडपुलाला कोणाचे नाव द्यायचे यावरून भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आमनेसामने आले आहेत.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Maharashtra Desha

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही