Urfi Javed | उर्फीच्या फॅशनचा कहर! कपड्यांच्या ऐवजी गुंडाळली प्लास्टिकची पिशवी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन आणि फॅशन आयकॉन उर्फी जावेद फॅशन म्हणून कधी काय करेल याचा अंदाज लावणे आता नेटकऱ्यांनी सोडून दिले आहे. कारण उर्फी कपड्यांवर कोणत्याही प्रकारचे एक्सपिरिमेंट करू शकते. तिच्या या फॅशनमुळे मोठा वादविवाद देखील निर्माण झाला होता. भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवरून पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला होता. पण ऐकेल ती उर्फी कसली? उर्फीने या सगळ्या वादविवादाकडे दुर्लक्ष करत पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये उर्फी पुन्हा एकदा अतरंगी कपड्यांमध्ये दिसतं आहे.

उर्फी जावेदने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने चक्क कपड्याने ऐवजी प्लास्टिकची पिशवी गुंडाळलेली दिसत आहे. उर्फीने काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे आणि खाली प्लास्टिकची पिशवी गुंडाळली आहे. उर्फीचा हा नवीन लुक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या या पोस्टवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहे.

उर्फी जावेद (Urfi Javed ) च्या पोस्टवरील कमेंट्स

Shakal thik thak hai but harkate ek dum chutyape ki😂
Mummiiiiiiiiii polythene urfi didi le gyi😭🤌
Arey wo Jeans ko chaati pe pehni huyi wali outfit kidhr hai?😂🥵
Ab bas nanga hona baaki hai 🥵🌚😂
Clothes be like me kya kru fir job chhod du 🥲
Urfi outfits😂
यह टैलेंट आपके पास आता कहां से है 😂😂😂😂 जो टैलेंट तुम्हारे पास है वह बॉलीवुड में किसी के पास नहीं😂😂😂 बाई द वे आपके कपड़ो को चूहों ने काट दिया लगता है😂😂😂😂
Naye zamane ka penguin 🐧😂😂😂😂

उर्फीच्या विचित्र फॅशनमुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. उर्फीने तिचा हा प्रकार बंद केला नाही तर मी तिला थोबाडेल अशा शब्दात चित्रा वाघ यांनी तिला इशारा दिला होता. त्यानंतर या दोघींमध्ये चांगलाच वादविवाद सुरू झाला होता. त्यांचा हा वाद राज्य महिला आयोगापर्यंत पोहोचला होता.

महत्वाच्या बातम्या