Share

‘आता किसिंग नको, चक्की पिसिंग करा’; ७० हजार कोटींच्या घोटाळ्यावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर ‘तोफ’गोळा!

७० हजार कोटींचा घोटाळा खरा असेल तर अजित पवारांचे ‘चक्की पिसिंग’ करा, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर केला आहे. महायुतीतील वादावर त्यांनी बोट ठेवलंय.

Published On: 

Uddhav Thackeray, Ajit Pawar

🕒 1 min read

मुंबई: राजकारणात शत्रू कोण आणि मित्र कोण हेच समजेनासं झालंय. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या असाच काहीसा गोंधळ आणि आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडाला आहे. पण यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या मुलाखतीत असा एक बॉम्ब टाकलाय, ज्याने महायुतीत नक्कीच मोठी खळबळ उडाली आहे. “जर आरोप खरे असतील तर लाड नको, थेट कारवाई करा,” अशा शब्दांत त्यांनी फडणवीसांना घेरलंय.

“फडणवीसांनी माफी मागावी किंवा…”

सत्तेत असूनही महायुतीचे नेते एकमेकांचे कपडे फाडत आहेत, असा घणाघात ठाकरेंनी केला. जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलंय. ठाकरे म्हणाले, “जर ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा खोटा असेल, तर फडणवीसांनी अजित पवारांची माफी मागावी. आणि जर तो आरोप खरा असेल, तर आता किसिंग नको, चक्की पिसिंग (तुरुंगाची हवा) करावं!” सत्तेसाठी हे लोक वाट्टेल ते करत असल्याचा, अगदी ‘पुणेरी मिसळ’ खायला एकत्र आल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणि अजित पवार गट यांच्यातच जुंपली असल्याचं चित्र आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आमदार महेश लांडगे यांनी अजित पवारांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, “आजवर भाजपने अजितदादांवर ब्र काढला नव्हता, पण आता हे सगळं फडणवीसांच्या अंगलट आलंय.” महायुतीत अजित पवारांवरून अंतर्गत धुसफूस वाढल्याचं हे लक्षण असल्याचं बोललं जातंय.

एकिकडे हिंदुत्वाचा नारा द्यायचा आणि दुसरीकडे सत्तेसाठी कोणाशीही हात मिळवायचा, यावरही ठाकरेंनी बोट ठेवलं. अकोटमध्ये भाजपने चक्क एमआयएम (MIM) सोबत, तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केली आहे. परभणीत शिंदे गटही MIM च्या मांडीला मांडी लावून बसलाय. यालाच ‘नंगानाच’ म्हणतात का? असा रोखठोक सवाल ठाकरेंनी उपस्थित केला आहे. १५ जानेवारीला होणाऱ्या मतदानात जनता या ‘पारदर्शक’ कारभाराचा फैसला करेलच.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)