🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर: राजकारणात सोयीसाठी कोणी किती खाली घसरावं, याला काही मर्यादा उरल्या आहेत का? हा प्रश्न सध्या छत्रपती संभाजीनगर मधील उद्धव ठाकरेंच्या भाषणाने ऐरणीवर आलाय. ज्या अजित पवारांच्या विरोधात एकेकाळी भाजपने रान उठवलं होतं, आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अक्षरशः सोलून काढलं. “७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे बैलगाडीभरून आणायच्या वल्गना करणारे फडणवीस आता गप्प का?” असा सवाल करत त्यांनी फडणवीसांची चांगलीच कोंडी केली.
ठाकरेंनी भरसभेत देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) उघड आव्हान दिलं. ते म्हणाले, “तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. जर तुमचे ते पुरावे खरे असतील, तर खटल्याचा निकाल लागेपर्यंत अजित पवारांना मंत्रिपदावरून तातडीने दूर करा. आणि जर ते पुरावे खोटे असतील, तर जाहीरपणे अजित पवारांची आणि जनतेची माफी मागा.” यावेळी बोलताना ठाकरेंचा पारा चांगलाच चढला होता. “तुम्ही सत्तेसाठी ‘दुतोंडी गांडुळासारखे’ वागत आहात,” अशा अत्यंत तिखट शब्दांत त्यांनी फडणवीसांवर प्रहार केला. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
“दोन हजारांसाठी भविष्य विकू नका…”
राजकीय फटकेबाजीनंतर ठाकरेंनी आपला मोर्चा मतदारांकडे वळवला. “ही लढाई माझ्या अस्तित्वाची नाही, तर तुमच्या आणि तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्याची आहे,” अशी भावनिक साद त्यांनी घातली. निवडणुकीच्या काळात सध्या PhonePe द्वारे दोन-दोन हजार रुपये वाटले जात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. “क्षणभराच्या सुखासाठी, दीड-दोन हजारांच्या आमिषाला बळी पडून स्वतःचं भविष्य विकू नका,” असं कळकळीचं आवाहन ठाकरेंनी मतदारांना केलं.
📌 महत्वाच्या बातम्या
- “कुंभमेळ्याचा पैसा ‘पक्षात’ लावण्यासाठी?”; गिरीश महाजनांवर पुण्यातून गंभीर आरोप, अजितदादांनाही ‘तो’ सल्ला!
- “भाजपचे राष्ट्र प्रथम नाही, बलात्कारी, भ्रष्टाचारी प्रथम…”; ठाकरेंचा भाजपवर ‘सर्जिकल स्ट्राईक’!
- “संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? चीड, राग आहे की नाही?”; वर्षातून ४४ दिवस पाणी मिळाल्याने ठाकरेंचा भडका!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










