🕒 1 min read
छत्रपती संभाजीनगर– वर्षाचे ३६५ दिवस, पण पाणी नशिबात फक्त ४४ दिवस? ऐकून धक्का बसला ना? पण हे भयानक वास्तव आहे छत्रपती संभाजीनगर शहराचं. हे ऐकून कोणाचंही डोकं सटकू शकतं, पण छत्रपती संभाजीनगरच्या जनतेला याचं काहीच वाटत नाही का? असा ज्वलंत सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भरसभेत विचारला आहे. याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर असा काही घणाघात केलाय की, उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला. “तुम्ही जिवंत आहात की नाही?” असा थेट सवालच त्यांनी संभाजीनगरकरांना विचारला आहे. पाण्याच्या प्रश्नावरून ठाकरेंनी सरकारला अक्षरशः सोलून काढलं.
भरसभेत बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा संताप अनावर झाला होता. शहराच्या पाणीपुरवठ्याची दयनीय अवस्था मांडताना ते कडाडले, “संभाजीनगरमध्ये माणसं राहतात की नाही? आणि जर राहतायेत, तर त्या माणसांच्या अंगात काय चीड, राग, द्वेष आहे की नाही?” हा प्रश्न विचारतानाच त्यांनी आपल्या सरकारचा दाखला दिला. ”
पाणीप्रश्नावरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर तोफ डागली. “आज तुमची ही अवस्था झालीये, त्याला कारणीभूत कोण?” असा सवाल करत त्यांनी थेट गद्दारांवर निशाणा साधला. “जर या गद्दारांनी आपलं सरकार पाडलं नसतं, तर आज मी तुम्हाला रोज पाणी देऊन दाखवलं असतं,” असं खुलं चॅलेंजच त्यांनी Eknath Shinde आणि फडणवीस सरकारला दिलं. ठाकरेंचा हा आक्रमक अवतार पाहून सभेतील वातावरण चांगलंच तापलं होतं.
“योजना मी स्वतःच्या हातात घेतली होती…”
सरकारच्या अकार्यक्षमतेचे वाभाडे काढताना ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातील निर्णयांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना नुसत्या गप्पा मारल्या नाहीत. जेव्हा मला समजलं की स्थानिक महानगरपालिकेकडे (Municipal Corporation) दमडीही नाही, तेव्हा मी ती पाणी योजना स्वतःच्या अधिकारात राज्य सरकारकडे घेतली आणि निधी ओतला. पण सरकार पडलं, पाणीपुरवठा योजना रखडली (Sambhajinagar Water Crisis) आणि तुम्हाला तहानलेलं राहावं लागतंय.” संभाजीनगरकरांचे हाल पाहून ठाकरेंनी व्यक्त केलेला संताप आता राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची संक्रांत होणार गोड? खात्यात थेट ३००० रुपये ‘या’ तारखेला जमा होण्याची शक्यता!
- तेजश्री प्रधाननंतर आता ‘नॅशनल क्रश’ घेणार मुख्यमंत्र्यांची ‘शाळा’; पुण्यात होणाऱ्या ‘त्या’ मुलाखतीची जोरदार चर्चा!
- “पुरावे बैलगाडीभर आणि कृती शून्य? फडणवीस ‘दुतोंडी गांडुळासारखे’…”; ठाकरेंचा सर्वात विखारी हल्ला!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










