Share

‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते…’; उद्धव ठाकरे भावूक, पण डोळ्यातील ‘त्या’ पाण्याचं सत्य काय?

‘बाळासाहेबांनी वाचवलं नसतं तर मोदी दिसले नसते’, हे सांगताना उद्धव ठाकरे भावूक झाले. मुलाखतीतील तो प्रसंग आणि ‘प्रदूषणामुळे’ आलेल्या त्या पाण्याची चर्चा जोरात!

Published On: 

Uddhav Thackeray

🕒 1 min read

मुंबई: राजकारणात जुन्या आठवणींनी बड्या नेत्याचे डोळे पानावल्याचं दुर्मिळ चित्र आज महाराष्ट्राने पाहिलं. महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिलेल्या Interview मध्ये अनेक गौप्यस्फोट केले. पण, भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका करताना एक क्षण असा आला, जिथे उद्धव ठाकरे काहीसे हळवे झाले.

“प्रमोदजी असते तरी मोदी दिसले नसते…”

भाजपकडून ‘मातोश्री’ आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या टीकेने व्यथित झालेल्या उद्धव ठाकरेंनी इतिहासाचे दाखले दिले. ते म्हणाले, “ज्या मातोश्रीने तुम्हाला वाचवलं, आज त्याच घराण्यावर चिखलफेक करताय? वाजपेयी जेव्हा मोदींना उचलून फेकणार होते, तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना वाचवलं. बाळासाहेबांनी (Balasaheb Thackeray) वाचवलं नसतं तर आज मोदी दिसले नसते. अगदी प्रमोद महाजन असते तरी मोदी दिसले नसते.” हे सांगताना वडिलांच्या आठवणीने उद्धव ठाकरेंचा आवाज जड झाला आणि डोळ्यात पाणी तरळल्याचं स्पष्ट दिसलं.

“तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय? तुम्ही भावूक झालात?” यावर ठाकरेंनी क्षणात स्वतःला सावरत मिश्कील उत्तर दिलं. “माझ्या डोळ्यात अश्रू नाहीत, हे कदाचित प्रदूषणामुळे झालं असेल,” असं म्हणताच तिथे हंशा पिकला. पण लगेचच गंभीर होत, “मी असा अश्रू ढाळणारा नाही,” असं ठणकावून सांगत त्यांनी आपल्या लढवय्या बाण्याची चुणूक दाखवली.

“मातोश्रीचे दरवाजे कुणासाठीही बंद नाहीत” देवेंद्र फडणवीसांसाठी (Devendra Fadnavis) मातोश्रीचे दरवाजे बंद आहेत का? या प्रश्नावरही त्यांनी रोखठोक भूमिका मांडली. “माझे दरवाजे कुणासाठीही बंद नाहीत. पण आमच्या कुटुंबाची बदनामी करणं थांबवा. मोदी मला ‘नकली संतान’ म्हणाले, ही कोणती संस्कृती?” असा सवाल करत त्यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. टीका करा, पण ती ओरबाडणारी नसावी, हा बाळासाहेबांचा मंत्रही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)