Share

‘भ्रष्ट माणसाच्या हातात सत्ता देऊ नका…’; मतदानाआधी तेजस्विनी पंडितची ‘ती’ पोस्ट वादळ उठवणार!

मतदानासाठी अवघे काही तास उरले असताना तेजस्विनी पंडितने एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना कानमंत्र दिला आहे. तिची ही रोखठोक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.

Published On: 

Tejaswini Pandit Post: मतदानाआधी अभिनेत्रीचं रोखठोक आवाहन

🕒 1 min read

निवडणुकीच्या रणधुमाळीत नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप ऐकून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण आता एका मराठमोळ्या अभिनेत्रीने मतदारांना थेट आरसा दाखवण्याचं काम केलं आहे. उद्या (१५ जानेवारी) राज्यभरात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नेतेमंडळी आणि काही कलाकार प्रचारात व्यस्त असताना, आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस्विनी पंडितने (Tejaswini Pandit) सोशल मीडियावर एक रोखठोक पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत मतदारांना अतिशय महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तिने स्पष्ट शब्दांत लिहिलंय, “आपल्या रोजच्या जीवनात नगरसेवक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच भ्रष्ट माणसांच्या हातात पालिका देऊ नका. सतर्क रहा. योग्य, सुज्ञ आणि सुशिक्षित उमेदवारांनाच निवडून द्या.” तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. एकीकडे कलाकार पक्षाचे झेंडे घेऊन फिरत असताना, तेजस्विनीने मात्र ‘नागरिक धर्मा’ची आठवण करून दिल्याने तिचं कौतुक होत आहे.

Tejaswini Pandit Post

काही दिवसांपूर्वीच ठाण्यात अभिनेत्री तेजश्री प्रधानने मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत ट्राफिक आणि खड्ड्यांच्या समस्यांचा पाढा वाचला होता आणि आता तेजस्विनीने थेट भ्रष्ट उमेदवारांना नाकारण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मराठी अभिनेत्री आता केवळ पडद्यावर नाही, तर सामाजिक भान जपण्यातही पुढे येत असल्याचं चित्र आहे.

जवळपास नऊ वर्षांच्या खंडानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. तब्बल १५,९३१ उमेदवार नशीब आजमावत आहेत. उद्या (गुरूवारी) मतदान पार पडेल आणि शुक्रवारी (१६ जानेवारी) निकाल हाती येईल. त्यामुळे आता तेजस्विनीचं हे आवाहन मतदार किती गांभीर्याने घेतात आणि कोणाच्या गळ्यात विजयाची माळ घालतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)