नाशिक, 6 ऑक्टोबर: राज्यभर गाजत असलेल्या सुमारे १६० कोटी रुपयांच्या शालार्थ आयडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आणि तत्कालीन शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब चव्हाण याला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. न्यायालयाने सोमवारी (ता. ५) झालेल्या सुनावणीत चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
नाशिक विभागाचा तत्कालीन शिक्षण उपसंचालक असलेल्या भाऊसाहेब चव्हाण याने २०२२ ते २०२४ या कालावधीत शिक्षण संस्थाचालकांना हाताशी धरून विविध शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केला. त्याने उत्तर महाराष्ट्रातील सुमारे ६०० ते ६५० शिक्षकांना बनावट शालार्थ आयडीचे वाटप केले. यासाठी प्रत्येक शिक्षकाकडून किमान तीन लाख रुपयांची रक्कम उकळण्यात आली. या माध्यमातून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा करत थेट शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारला आहे.
या घोटाळ्याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात २०२५ मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यापासून संशयित चव्हाण पसार आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून सुरू आहे.
यापूर्वी जिल्हा सत्र न्यायालयानेही चव्हाणचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र तिथेही त्याला दिलासा मिळाला नाही. गेल्या दोन आठवड्यांत उच्च न्यायालयाने तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि शिक्षण संस्थाचालक शरद शिंदे यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत. त्यामुळे या घोटाळ्यातील संशयितांभोवती पोलिसांचा फास आणखी आवळला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- बुलडाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा; कव्वालीच्या कार्यक्रमात नगरसेवकासह दोघांची हत्या
- सूर्यकुमार यादवला मुंबईच्या रणजी संघातून वगळले; सिद्धेश लाडकडे नेतृत्व
- मोदी मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत; हरदीपसिंग पुरींसह दोन मंत्र्यांची गच्छंती, श्रीकांत शिंदेंना संधी?
Quick Answers
भाऊसाहेब चव्हाण याने २०२२ ते २०२४ दरम्यान संस्थाचालकांना हाताशी धरून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार केला आणि उत्तर महाराष्ट्रातील ६०० ते ६५० शिक्षकांना बनावट शालार्थ आयडी देऊन कोट्यवधी रुपयांची माया गोळा केल्याचा आरोप आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने भाऊसाहेब चव्हाण याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र विशेष तपास पथकाकडून (SIT) केला जात आहे.
गेल्या दोन आठवड्यांत उच्च न्यायालयाने तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण कुवर आणि शिक्षण संस्थाचालक शरद शिंदे यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले आहेत.
टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.
Ask Maharashtra Desha
आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.








