Share

न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर तुकाराम मुंढेंची दखल; ‘फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ मथळ्याखाली विशेष लेख

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची द न्यूयॉर्क टाइम्सने पहिल्या पानावर दखल घेत त्यांना ‘रॉकस्टार’ म्हटले आहे.

Published On: 

Tukaram Mundhe CM Demand 

न्यूयॉर्क, 6 ऑक्टोबर: महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईची दखल थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. अमेरिकेतील सुप्रसिद्ध ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ या वृत्तपत्राने त्यांच्या पहिल्या पानावर मुंढे यांच्या कार्याविषयी विशेष वृत्त प्रसिद्ध केले आहे.

या वृत्ताला “इन इंडिया, अ फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार” असा लक्षवेधी मथळा देण्यात आला आहे. तसेच, “डिनर्स रिव्हेर हीम अँड ओनर्स फियर हीम” म्हणजेच ‘ग्राहक त्यांना मानतात, तर खाद्यव्यावसायिक त्यांच्या कारवाईला घाबरतात,’ अशा शब्दांत त्यांच्या कार्यपद्धतीचे वर्णन या लेखात करण्यात आले आहे.

एफडीए आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मुंढे यांनी राज्यात धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यपदार्थांची दुकाने, गोदामे आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या ‘डार्क स्टोअर्स’वर अचानक छापे टाकण्यास सुरुवात केली. मुंबईतील अनेक नामांकित खाद्य आस्थापने आणि प्रसिद्ध चेन रेस्टॉरंट्सची याअंतर्गत झाडाझडती घेण्यात आली.

या तपासणी मोहिमेदरम्यान ब्लिंकइट आणि झेप्टोसारख्या कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सवरही एफडीएने कारवाई केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धाडींमध्ये झुरळे, मुदत संपलेले (कालबाह्य) खाद्यपदार्थ आणि स्वच्छतेचा पूर्णपणे अभाव अशा गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.

स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत मुंढे यांनी आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत, तर काही आस्थापने तात्पुरती बंद केली आहेत. या कडक कारवाईमुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली असली तरी, अन्नाच्या गुणवत्तेबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांकडून मुंढे यांना सर्व स्तरांतून मोठा पाठिंबा मिळत आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या विशेष वृत्ताला “इन इंडिया, अ फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार” असा मथळा दिला आहे.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही