अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत; संजय राऊत यांची सडकून टीका

मोर्च्यात केवळ ८ हजार लोक दिसल्याच्या दाव्यावरून संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published On: 

MHD LOGO

प्रतिनिधी, 14 ऑक्टोबर: देशभरात लोकशाहीची गळचेपी होत असल्याच्या निषेधार्थ दिल्लीसह विविध राज्यांमध्ये मोठी आंदोलने सुरू आहेत. या आक्रोशावर इतके दिवस तोंड बंद ठेवून 'भूमिगत' असलेले अमित शाह बऱ्याच काळाने प्रकट झाले आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

सोमवारच्या मोर्च्यात दीड किलोमीटरच्या क्षेत्रात केवळ ८ हजार लोक उपस्थित होते, या शाह यांच्या दाव्याचा राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. लाखोंचा मोर्चा त्यांना केवळ ८ हजारांचा दिसत असल्याने गृहमंत्र्यांची नजर कमकुवत झाली असल्याचे राऊत म्हणाले. 'हा माणूस किती खोटं बोलतो?' असा सवाल करत, नेत्रदानानंतर अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजेत, अशी बोचरी टीका त्यांनी केली.

अमित शाह यांची प्रकृती सध्या ठीक नसून ते मानसिक दडपणाखाली असल्याचा दावाही राऊत यांनी केला. त्यांच्या तब्येतीबाबत अनेक गोष्टी समोर येत असल्याने त्यांनी आपली काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला राऊत यांनी दिला. तसेच, त्यांची कमकुवत झालेली नजर आणि एकूणच आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने एक विशेष समिती स्थापन केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

📌 महत्वाच्या बातम्या

Quick Answers

सोमवारच्या मोर्च्यात दीड किलोमीटरच्या क्षेत्रात केवळ ८ हजार लोक उपस्थित होते, या अमित शाह यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनी टीका केली. लाखोंचा मोर्चा त्यांना केवळ ८ हजारांचा दिसत असल्याने गृहमंत्र्यांची नजर कमकुवत झाली असल्याचे राऊत म्हणाले.

टीप: खालील झटपट उत्तरे AI च्या सहाय्याने तयार करण्यात आली असून ती वरील मूळ बातमीतील माहितीनुसार आहेत. अधिक संदर्भासाठी संपूर्ण बातमी वाचा.

AI-assisted · Powered by Gemini
AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
हेही विचारू शकता
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही