Share

“देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक..”; शिंदेंच्या नेत्याला सुनावताना भाजप नेत्याची जीभ घसरली!

“तुम्ही पालक असाल, पण देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मालक आहेत.” संजय केनेकरांच्या या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली असून भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे.

Published On: 

Sanjay Kenekar Controversial Statement on Devendra Fadnavis

🕒 1 min read

छत्रपती संभाजीनगर- लोकशाहीत जनता जनार्दन ‘मालक’ असते आणि लोकप्रतिनिधी हे ‘सेवक’ असतात, याचा विसर सत्तेतील नेत्यांना पडलाय की काय? असा प्रश्न पडण्यासारखं एक वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या नेत्याने केलं आहे. मित्रपक्षाच्या पालकमंत्र्यांवर टीका करण्याच्या नादात भाजप नेते संजय केनेकर (Sanjay Kenekar) यांची जीभ घसरली असून, त्यांनी चक्क “देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे मालक (Owner) आहेत,” असा अजब दावा भर सभेत केला आहे.

Sanjay Kenekar Controversial Statement on Devendra Fadnavis

संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अंतर्गत कलहाचा भडका उडाला आहे. भाजप नेते संजय केनेकर यांनी शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर अक्षरशः आगपाखड केली. शिरसाट यांनी बांधलेलं ‘व्हाईट हाऊस’ आणि घराणेशाहीवर टीका करताना केनेकरांचा तोल सुटला. शिरसाटांना उद्देशून ते म्हणाले, “तुम्ही तरी छत्रपती संभाजीनगरचे पालक आहात, पण आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत… देवेंद्रजी फडणवीस या महाराष्ट्राचे मालक आहेत.”

केनेकरांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महायुतीत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, अजित पवार सोबत आहेत, पण केनेकरांनी थेट फडणवीसांनाच राज्याचे ‘मालक’ घोषित करून टाकल्याने मित्रपक्षांची काय अवस्था आहे, हे त्यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं असल्याची चर्चा आहे. “तुम्ही कमळाच्या पिचवर खेळताय हे विसरू नका,” अशी तंबीही त्यांनी शिरसाटांना दिली.

एकीकडे शिवसैनिकांच्या त्यागाचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे स्वतःच्याच नेत्याला लोकशाही राज्याचे ‘मालक’ म्हणायचं, या दुटप्पी भूमिकेवरून आता विरोधक भाजपला घेरण्याची शक्यता आहे. संजय केनेकरांच्या या “मालकी हक्काच्या” भाषणाची क्लिप सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, नेटकरी भाजपच्या या ‘मस्ती’वर सडकून टीका करत आहेत.

"संजय शिरसाट तुम्ही 'व्हाईट हाऊस' बांधलं, पण शिवसैनिकांना घर नाही"; भाजपचा थेट हल्लाबोल!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)