क्रीडा प्रतिनिधी | वेस्ट इंडिज कसोटी संघासाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली असून, रोस्टन चेसकडे कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. क्रेग ब्रेथवेटच्या राजीनाम्यानंतर क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या कर्णधारपदाचा निर्णय अखेर जाहीर झाला आहे.
वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावरून रोस्टन चेसच्या नियुक्तीची घोषणा केली. जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत चेस संघाचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या साखळीतील पहिली मालिका ठरणार आहे. मालिकेला 25 जूनपासून सुरुवात होणार आहे.
Roston Chase Named New West Indies Test Captain
चेसचा हा 50 वा कसोटी सामना असेल, तसेच पहिलाच कर्णधार म्हणून असलेला सामना ठरेल. याआधी त्याने 49 कसोटी सामन्यांत 2,265 धावा केल्या असून 85 विकेट्स घेतल्या आहेत. चेसने शेवटचा कसोटी सामना मार्च 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
क्रेग ब्रेथवेटचा कार्यकाळ संपन्न
चेसपूर्वी संघाचे नेतृत्व करणारा क्रेग ब्रेथवेटने मार्चमध्ये राजीनामा दिला होता. त्याने 39 कसोटींमध्ये विंडीजचं नेतृत्व केलं, ज्यात 10 विजय, 22 पराभव आणि 7 अनिर्णित सामने खेळले गेले. ऑस्ट्रेलिया संघ जूनमध्ये विंडीज दौऱ्यावर जाणार असून 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ही मालिका दोन्ही संघांसाठी नव्या विश्वचषक साखळीची सुरुवात असेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- भारताने किती विमाने गमावली आणि पाकिस्तानला हल्ल्याची माहिती का दिली? – राहुल गांधी
- RCB vs KKR सामना रद्द होण्याची शक्यता, केकेआरचं आव्हान धोक्यात
- सुप्रीम कोर्टातच अभिनेत्री निम्रतच्या पार्श्वभागाला स्पर्श; कोर्टरूममध्ये १९व्या वर्षी अनुभव













