Share

Rohit Sharma करणार मोठा रेकॉर्ड; ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरणार

Rohit Sharma । IPL 2024 चा १७ वा सिझन उद्यापासून सुरु होत आहे. सलामीचा सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि RCB मध्ये पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे. मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित … Read more

Published On: 

Rohit Sharma । IPL 2024 चा १७ वा सिझन उद्यापासून सुरु होत आहे. सलामीचा सामना हा गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्स आणि RCB मध्ये पार पडणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे होणार आहे.

मुंबई इंडियन्स मध्ये रोहित शर्मा ऐवजी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित जरी कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी सांभाळणार नसला तरी तो आपल्या स्फ़ोटक फलंदाजीतून एक मोठा विक्रम करणार आहे.

रोहित शर्मा IPL 2024 T20 क्रिकेटमधील 500 सिक्स पूर्ण करणार आहे. रोहितने आत्तापर्यंत ४८७ सिक्स लगावले आहेत. त्याला आता ५०० सिक्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी १३ सिक्सची कमी आहे. या आयपीएलमध्ये १३ सिक्स  लावल्यावर रोहित हा ५०० सिक्स पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरेल.

Rohit Sharma IPL 2024 SIX record

T20 क्रिकेटमध्ये भारतातून सर्वाधिक सिक्स मारण्याच्या यादीत सुरेश रैना आणि महेंद्रसिंग धोनी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. दोघांनी प्रत्येकी ३२५ सिक्स लगावले आहेत तर विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने T20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत ३७१ सिक्स लगावले आहेत आणि रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे, त्याने आतापर्यंत ४८७ सिक्स लगावले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये T20i सामन्यात सर्वाधिक सिक्स हे ख्रिस गेलने १०५६ तर कायरन पोलार्ड ८६०, आंद्रे रसल ६६८, एलेक्स हेल्स ४९४, कॉलिन मुनरो ५४८आणि रोहित शर्मा ४८७ सिक्स लगावले आहेत. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय T20i यादीत सुद्धा सहाव्या क्रमांकावर आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही