हार्दिकला पाहताच Rohit Sharma ने केलं असे काही की, होतेय त्याचे कौतुक

Ipl 2024 Hardik Pandya And Rohit Sharma Meet And Huge Watch Video Latest Marathi Sports News

Rohit Sharma IPL 2024  | IPL चा १७ वा हंगाम उद्या (२२ मार्च) सुरु होत आहे. यावर्षी मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा करणार नसून हार्दिक पांड्या करणार आहे. रोहितला कर्णधार पदावरून काढल्यानंतर चाहते नाराज होते. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत हार्दिकला रोहितच्या कर्णधारपदाबद्दल प्रश्न विचारल्यानंतर त्याने उत्तर देणे टाळले होते.

रोहितला अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका चाहते करत आहेत. आता आयपीएल तोंडावर आली असताना संघातील वातावरण ठिक नसल्याचं बोललं जातं आहे. परंतु आता रोहित आणि हार्दिकचा एकमेकांना गळाभेट करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यातून दोघांमध्ये सर्वकाही ओके असल्याचं चित्र दिसत आहे.

रोहित शर्मा सोमवारी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला, तसेच कर्णधार हार्दिक पांड्याने सुद्धा दुखापतीतून सावरल्यानंतर नेटमध्ये सरावाला सुरुवात केली आहे. एमआयच्या कॅम्पमध्ये सराव सामना सुरु होण्यापूर्वी हार्दिक आणि रोहित आमने सामने आले आणि एकमेकांना मिठी मारली. त्यांचा व्हिडीओ कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंट वरून या व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्याला चाहत्यांनी मोठया प्रमाणात पसंती दिली आहे.

Ipl 2024 Hardik Pandya And Rohit Sharma Meet And Huge

काही वर्षांपूर्वी रोहित संघाचा कर्णधार असताना हार्दिक पांड्याला संघाने बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं आणि सध्या त्याच पांड्याच्या कर्णधारपदाखाली रोहित शर्माला खेळावं लागणार आहे. परंतु मोठ्या मनाने रोहितने पांड्यासोबत गळाभेट घेतली आणि स्माईल करुन दोघांनी एकमेकांसोबत गप्पा सुद्धा मारल्या, यामध्ये रोहित खुप मोठया मनाचा आहे हे दिसून आलं. दोघे एकत्र दिसल्याने आता मुंबई इंडियन्सचे चाहतेही शांत होतील.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली गेल्या १० वर्षांत संघाने ५ आयपीएल ट्रॉफ्या मिळवल्या आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सकडे आणि यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते, त्यामुळे अचानकपणे रोहितकडून कर्णधार पद काढून घेतल्याने चाहते संतापले होते. रोहितने यावर अजूनही काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना २४ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.