Share

‘भावा, प्लीज ओपनिंगला ये…’; पंतच्या T20 करिअरला वाचवण्यासाठी ‘या’ दिग्गजाचा कळकळीचा सल्ला!

T20 World Cup 2026 मधून वगळल्यानंतर ऋषभ पंतला रॉबिन उथप्पाने ओपनिंग करण्याचा सल्ला दिला आहे. IPL 2026 मध्ये हा बदल पंतसाठी फायदेशीर ठरेल का?

Published On: 

Rishabh Pant

🕒 1 min read

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये टॅलेंटला कमी नाही, पण त्या टॅलेंटला योग्य वेळी योग्य संधी मिळणं गरजेचं असतं. टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या अशाच एका कठीण टप्प्यातून जातोय. T20 World Cup 2026 च्या संभाव्य संघातून त्याला वगळल्याने क्रिकेट विश्वात चर्चांना उधाण आलंय. पण आता भारताचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने पंतसाठी एक ‘गेमचेंजर’ सल्ला दिला आहे, ज्यामुळे पंतचं नशीब पुन्हा पालटू शकतं.

IPL 2026 पंतसाठी ‘करो या मरो’?

रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) यूट्यूब चॅनेलवर बोलताना स्पष्ट केलंय की, ऋषभ पंतने आता मधल्या फळीत बॅटिंग करणं थांबवलं पाहिजे. उथप्पाच्या मते, “जर पंतला T20 मध्ये आपलं वर्चस्व पुन्हा मिळवायचं असेल, तर त्याने ओपनिंगला किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला यायला हवं.” येत्या IPL 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा (LSG) कॅप्टन म्हणून पंतने हा निर्णय घ्यावा, अशी कळकळीची विनंती उथप्पाने केली आहे.

Robin Uthappa on Rishabh Pant IPL 2026

२७ कोटींचा खेळाडू आणि फक्त २६९ रन्स!

गेल्या वर्षी म्हणजेच IPL 2025 मध्ये लखनौने पंतवर २७ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावली होती. पण पंतची बॅट अपेक्षित तळपली नाही. १४ सामन्यांत त्याला फक्त २६९ धावा करता आल्या. कर्णधार असूनही तो पाचव्या क्रमांकावर खेळला, ज्यामुळे त्याला सेट व्हायला वेळच मिळाला नाही. उथप्पाने आठवण करून दिली की, “जेव्हा पंतने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग केली होती, तेव्हा त्याने (Rishabh Pant) बंगळुरूविरुद्ध (RCB) नाबाद ११८ धावा कुटल्या होत्या. त्याला पॉवरप्लेचं स्वातंत्र्य हवं आहे.”

“तो एकदा सेट झाला की…”

उथप्पाने पंतला थेट आवाहन करताना म्हटलंय, “भावा, प्लीज तू ओपनिंगला ये (Bro, please open). तू भारतीय T20 क्रिकेटला हादरवून सोडशील.” पॉवरप्लेमध्ये क्षेत्ररक्षणाचे नियम पंतच्या आक्रमक खेळाला पूरक आहेत. एकदा का तो सेट झाला, की मग फिल्डिंग कशीही असो, पंतला थांबवणं गोलंदाजांना अशक्य होईल, असा विश्वास उथप्पाने (Robin Uthappa) व्यक्त केलाय.

आता हा सल्ला मनावर घेऊन Rishabh Pant पुन्हा सलामीला येऊन जुन्या स्टाईलने धमाका करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)