🕒 1 min read
मुंबई– मुंबई वाचवायची असेल तर ही शेवटची लढाई आहे, आज हरलात तर संपून जाल… शिवतीर्थावरून राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अशी डरकाळी फोडताच उपस्थित लाखो मुंबईकरांच्या अंगावर काटा आला. निमित्त होतं मुंबई महापालिका (BMC Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक संयुक्त सभेचं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या सभेकडे लागलं होतं. आणि अपेक्षेप्रमाणे, राज ठाकरेंनी आपल्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ स्टाईलमध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींवर तुफान हल्लाबोल केला.
“ड्रग्ज माफिया ते बलात्कारी… भाजपची युती कोणाशी?”
भाजपच्या नैतिकतेचे वाभाडे काढताना राज ठाकरे आक्रमक झाले. “अकोटमध्ये ‘एमआयएम’सोबत (AIMIM) आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती करणारे हेच का ते हिंदुत्ववादी?” असा सवाल त्यांनी केला. इतकंच नाही तर, “तुळजापुरात ड्रग्ज रॅकेटमधील विनोद गंगणेला आणि बदलापूरमध्ये बलात्काराचा आरोप असलेल्या तुषार आपटेला नगरसेवक पद दिलं जातंय. ही हिंमत येते कुठून?” असा संतप्त सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.
Raj Thackeray Speech Mumbai
‘लाव रे तो व्हिडिओ’ अदानींच्या संपत्तीचा पंचनामा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपलं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. “२०१४ ते २०२४ या १० वर्षांत गौतम अदानींची (Gautam Adani) संपत्ती कशी वाढली, हे आता मी पुराव्यानिशी दाखवणार आहे,” असं म्हणत त्यांनी स्क्रीनकडे इशारा केला. भारताचा नकाशा आणि अदानींचे प्रोजेक्ट्स दाखवत ते म्हणाले, “जगात कुणीच १० वर्षांत एवढा श्रीमंत झाला नसेल. सिमेंट उद्योगात तर ते कुठेच नव्हते, आज २ नंबरला आहेत. मुंबई विमानतळाची जागा हडपून तिथं कार्गो हलवायचा आणि मुंबई हळूहळू गुजरातला जोडायची, हा यांचा ‘लॉंग टर्म प्लॅन’ आहे.”
“दुबार मतदार दिसला की फोडून काढा” मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ही ‘करो या मरो’ची लढाई असल्याचं सांगत, राज ठाकरेंनी शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना थेट आदेशच दिले. “मतदानाच्या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून सतर्क राहा. ईव्हीएम (EVM) आणि बोगस मतदानाची भीती आहेच. जर कुणी दुबार मतदार आढळला, तर त्याला तिथेच फोडून काढा,” असं खळबळजनक आवाहन त्यांनी केलं. “पैसे फेकले की मराठी माणूस विकला जातो, अशी आपली किंमत यांनी केली आहे. पण लक्षात ठेवा, जमीन आणि भाषा गेली की तुम्ही संपलात,” अशी भावनिक सादही त्यांनी घातली.
कृपाशंकर सिंह आणि ‘तो’ अण्णामलाई
उत्तर भारतीयांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरेंनी भाजपला धारेवर धरलं. “कृपाशंकर सिंह म्हणतोय, मुंबईचा महापौर उत्तर भारतीय असेल. आणि तो अण्णामलाई म्हणतोय मुंबईचा महाराष्ट्राशी काय संबंध? अरे भडव्या, तुझा काय संबंध इथे बोलायचा?” अशा तिखट शब्दांत त्यांनी समाचार घेतला. “कोल्हापूर-साताऱ्याची माणसं यांना परकी वाटतात आणि भैया-बिहारी आपले वाटतात?” असा सवाल करत त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा पेटवला.
📌 महत्वाच्या बातम्या
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
- ‘रणवीर सिंगला ५० दिवसांत विसरतील, पण..’; अभिजीत बिचुकलेंचा नवा दावा!
- BMC Election 2026: ऐन निवडणुकीत भाजप-मनसे भिडले; मोठा राडा, ‘त्या’ एका कारणावरून हाणामारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










