🕒 1 min read
नाशिक – सत्तेची खुर्ची मिळाली की काहींचे पाय जमिनीवर राहत नाहीत, आणि मग जीभ घसरायला वेळ लागत नाही. याचाच प्रत्यय नुकताच लातूरमध्ये आला आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जे काही ऐकवलं, त्याने भाजप नेत्यांचे धाबे दणाणले असतील. भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याचा राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला आहे. “तुमची पदं काढून घेतली तर बाजूच्या गल्लीत कोणी गणपतीलाही बोलावणार नाही,” अशा सणसणीत शब्दांत राज यांनी चव्हाणांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
Raj Thackeray Slams BJP Ravindra Chavan
“नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?”
राज ठाकरेंनी रवींद्र चव्हाणांच्या विधानावर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “कोण आहात तुम्ही? विलासरावांच्या आठवणी पुसून टाकू म्हणणारे तुम्ही कोण? साधी गोष्ट आहे, आपण पदाने मोठे झालो आहोत, याचंही भान या लोकांना उरलेलं नाही.” पुढे बोलताना त्यांनी चव्हाणांच्या राजकीय वकुबावरच बोट ठेवलं. “यांची पदं काढा हो उद्या, बाजूच्या गल्लीत कोणी गणपतीला आरतीला सुद्धा बोलावणार नाही,” अशा शब्दांत राज यांनी चव्हाणांची चांगलीच धुलाई केली.
वाद नेमकं कशामुळे पेटला?
लातूर (Latur) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या एका मेळाव्यात बोलताना रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची जीभ घसरली होती. कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून त्यांनी, “लातूरमधून विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसल्या जातील, यात शंका नाही,” असं वादग्रस्त विधान केलं होतं. ज्या विलासरावांनी लातूरला ओळख दिली, त्यांच्याबद्दल असं बोलल्याने काँग्रेससह देशमुखांच्या चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली. अमित देशमुख आणि रितेश देशमुख यांनीही यावर कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली होती.
अखेर चव्हाणांची माघार!
राज ठाकरेंचा हा ‘हंटर’ आणि चहूबाजूंनी होणारी टीका पाहून अखेर रवींद्र चव्हाण नरमले. जनक्षोभ लक्षात येताच त्यांनी आपल्या वक्तव्यावर यू-टर्न घेतला. “माझा उद्देश लातूरमध्ये नवीन विकासाचे रेकॉर्ड करण्याबद्दल होता, विलासरावांच्या कार्याबद्दल आम्हा सर्वांना आदरच आहे,” असं सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण तोपर्यंत व्हायचं ते डॅमेज होऊन गेलं होतं.
📌 महत्वाच्या बातम्या
- मनोरमा-दिलीप खेडकरांना गुंगीचं औषध, पूजाला बांधून ठेवलं; वादग्रस्त ‘IAS’च्या घरात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
- “देवाच्या नावाखाली ६० हजार कोटींचा डल्ला?”; राजू शेट्टींचा फडणवीसांवर सर्वात मोठा ‘बॉम्ब’!
- “पुरावे खरे असतील तर पवारांची हकालपट्टी करा, नाहीतर…”; ७० हजार कोटींवरून ठाकरेंचा फडणवीसांना ‘अल्टीमेटम’!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










