🕒 1 min read
मुंबई – नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी पार्ट्या, पब आणि डीजेचा दणदणाट हवाच, असं काही नसतं, हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. मराठमोळ्या ‘फुलवंती’ने अर्थात प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) २०२५ वर्षाला ज्या पद्धतीने निरोप दिला आणि नववर्षाचं स्वागत केलं, ते पाहून तुम्हालाही आपल्या मातीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. सध्या सोशल मीडियावर तिच्या या ‘सिंपल पण स्पेशल’ सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे.
चुलीवरचा बेत अन् शेकोटीची उब
ग्लॅमरच्या झगमगाटात वावरणाऱ्या प्राजक्ताने वर्षाचा शेवट अतिशय पारंपरिक पद्धतीने केला. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती चक्क चुलीवर स्वयंपाक करताना दिसत आहे. ‘Today’s Menu चुलीवरचं व्हेज जेवण…’ असं कॅप्शन देत तिने भाज्या शिजवल्या. बोचऱ्या थंडीत कुटुंबासोबत शेकोटी पेटवून गप्पा मारणं आणि चुलीवरचं जेवण, या साधेपणाने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
Prajakta Mali Dance Viral Video
शांत आणि सोज्वळ दिसणाऱ्या प्राजक्ताने थंडीत आपल्या कुटुंबासोबत एक भन्नाट डान्सही केलाय. सध्या ‘धुरंधर’ सिनेमाची आणि अक्षय खन्नाच्या (Akshay Khanna) गाण्याची क्रेझ आहे. याच गाण्यावर प्राजक्ताने आपल्या ‘फॅमिली’सोबत ठेका धरला. हा व्हिडीओ शेअर करताना ती म्हणते, “गेली २० वर्षे आम्ही असंच एकत्र सेलिब्रेशन करतोय.” तिचा हा उत्साह पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.
तिच्या या व्हायरल व्हिडीओची चर्चा असतानाच, दुसरीकडे तिच्या कामाबद्दलही मोठी अपडेट समोर आली आहे. प्राजक्ता लवकरच ‘Zee 5’ च्या ‘देवखेळ’ (Devkhel) या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे यात तिच्यासोबत सुपरस्टार अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे चुलीवरच्या जेवणाप्रमाणेच तिची ही नवी सीरिजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘माझा संयम कायम, पण दादांचा सुटलाय’; फडणवीसांचा पुण्यात मोठा गौप्यस्फोट!
- ‘९ वर्षे निवडणुका नाहीत तर कंठ कसा फुटणार?’; दादांचा फडणवीसांवर जोरदार पलटवार!
- दि.बा. पाटलांचं नाव नको, Navi Mumbai विमानतळाला ‘मोदीं’चं नाव देण्याचा डाव? काँग्रेसचा खळबळजनक आरोप!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










