Share

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेमध्ये पैसे होणार थेट दुप्पट! एकदा गुंतवा अन् टेंशन विसरा

पैसे सुरक्षित राहावेत आणि वाढावेत असं प्रत्येकाला वाटतं. पोस्टाची ‘ही’ योजना तुमचे पैसे थेट दुप्पट करते, ते ही सरकारी गॅरंटीसह!

Published On: 

Post Office Scheme KVP: पैसे होणार थेट दुप्पट! जाणून घ्या

🕒 1 min read

पुणे – कष्टाने कमावलेला पैसा बुडाला तर? ही भीती प्रत्येकालाच असते. त्यातच शेअर बाजारातील चढ-उतार आणि खाजगी फंड्समधील धोकाधडी यामुळे सामान्य माणूस हवालदिल होतो. पण जर तुम्हाला सरकारी गॅरंटीसह पैसे थेट दुप्पट मिळाले तर? विश्वास बसत नाहीये ना? पण हे खरं आहे. पोस्ट ऑफिसची (Post Office Scheme) एक अशी भन्नाट योजना आहे, जी सध्या गुंतवणुकदारांसाठी ‘हुकमी एक्का’ ठरत आहे.

आम्ही बोलत आहोत किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra – KVP) या योजनेबद्दल. ही पोस्ट ऑफिसची सर्वात लोकप्रिय स्मॉल सेविंग स्कीम मानली जाते. सुरक्षितता आणि खात्रीशीर परतावा हे या योजनेचे वैशिष्ट्य आहे. सध्या या योजनेवर सरकार ७.५ टक्के दराने दमदार व्याज देत आहे.

KVP Post Office Scheme

या योजनेत तुम्ही गुंतवलेली रक्कम एका ठराविक काळानंतर चक्क दुप्पट होते. सध्याच्या ७.५ टक्के व्याजदराच्या हिशोबाने, जर तुम्ही आज पैसे गुंतवले, तर ९ वर्षे ७ महिन्यात (११५ महिने) तुमचे पैसे थेट डबल होतात. म्हणजे तुम्ही १ लाख गुंतवले तर तुम्हाला २ लाख रुपये मिळतील. यात बाजाराचा कोणताही धोका (Market Risk) नाही.

या योजनेत वयाची १८ वर्षे पूर्ण असलेली कोणतीही व्यक्ती गुंतवणूक कोण करू शकतं. यामध्ये किमान गुंतवणूक ही अवघ्या १००० रुपयांपासून सुरूहोते तर जास्तीत जास्त गुंतवणुकीला कोणतीही मर्यादा नाही (No Limit).

अनेकदा फिक्स डेपॉझिटमध्ये पैसे अडकतात, पण इथे तसं नाही. या योजनेत तुम्हाला तरलता (Liquidity) मिळते. गुंतवणूक केल्यानंतर २ वर्षे ६ महिन्यांनंतर (अडीच वर्षे) तुम्ही केव्हाही तुमचे पैसे काढून घेऊ शकता. त्यामुळे मुलांचे शिक्षण असो वा लग्नाचे नियोजन, ही योजना सर्वांसाठी फायदेशीर ठरत आहे.

(Investment Tips: गुंतवणुकीचे निर्णय घेताना आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)