🕒 1 min read
मुंबई – शेअर बाजारात कधी कोणाचं नशीब फळफळेल आणि कोणाला लॉटरी लागेल, हे सांगता येत नाही. याचेच ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा समोर आले आहे. काही शेअर्स असे असतात जे गुपचूप वाढतात आणि गुंतवणूकदारांना करोडपती बनवतात. असाच एक ‘मल्टिबॅगर’ स्टॉक सध्या चर्चेत आहे, ज्याची किंमत ५५ रुपयांपेक्षा कमी आहे, पण रिटर्न्स मात्र २००० टक्क्यांच्या घरात आहेत!
आम्ही बोलत आहोत One Point One Solutions या कंपनीबद्दल. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये पुन्हा तेजी पाहायला मिळाली. हा स्टॉक २ टक्क्यांनी वधारून बीएसईवर (BSE) ५४.७० रुपयांवर पोहोचला. या तेजीमागचं कारण म्हणजे कंपनी बाजारातून मोठा निधी (Fundraising) उभा करण्याच्या तयारीत आहे. १२ जानेवारी २०२६ रोजी शेअरहोल्डर्सनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, त्यामुळे हा स्मॉल कॅप शेअर पुन्हा लाईमलाईटमध्ये आला आहे.
Stock Market : One Point One Solutions
या शेअरने गेल्या काही वर्षांत जी कामगिरी केली आहे, ती थक्क करणारी आहे. गेल्या एका वर्षात हा स्टॉक ६ टक्क्यांनी वाढला असला आणि ३ वर्षांत २३० टक्क्यांची उडी घेतली असली, तरी ५ वर्षांचा आलेख डोळे फिरवणारा आहे. या ५ वर्षांच्या काळात या शेअरने गुंतवणूकदारांना तब्बल २००० टक्क्यांचा (2000% Returns) बंपर परतावा दिला आहे. म्हणजेच, ज्यांनी ५ वर्षांपूर्वी यात १ लाख रुपये गुंतवले असते, त्यांचे मूल्य आज २० लाखांच्या घरात असते.
आता कंपनीचे प्रमोटर्स अक्षय छाबडा, अफरीन डीआयए आणि काही नॉन-प्रमोटर्स वॉरंट्स जारी करून पैसे उभारणार आहेत. यामध्ये एएल महा इन्व्हेस्टमेंट फंडसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे हा शेअर येत्या दिवसांत पुन्हा रॉकेट स्पीड पकडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
(टीप: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण असते. ही माहिती केवळ अभ्यासासाठी असून, कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
📌 महत्वाच्या बातम्या
- “घरी आल्यावर काय हाकलून देऊ?” अदानींच्या व्हायरल फोटोवर राज ठाकरेंचे सडेतोड उत्तर; म्हणाले, “मी इतका ‘अडाणी’ नाहीये!”
- निवडणुकीचे नियम बदलले? प्रचार संपला तरीही उमेदवारांना ‘ही’ मुभा; आयोगाचा निर्णय वाचून तुम्हीही चक्रावाल!
- ZP Election: अखेर बिगुल वाजले! १२ जिल्ह्यांत ‘या’ तारखेला मतदान; तुमचं गाव यादीत आहे का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now







