Share

“अदानी नको, पण ‘मुलतानी-ममदानी’ चालतात का?”; राज ठाकरेंच्या व्हिडीओनंतर नितेश राणेंचा खळबळजनक वार!

राज ठाकरेंनी अदानींचा व्हिडिओ दाखवताच नितेश राणेंनी ‘मुलतानी-ममदानी’चा उल्लेख करत जोरदार पलटवार केला असून मुंबईकरांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Published On: 

Nitesh Rane vs Raj Thackeray BMC Election 2026

🕒 1 min read

मुंबई – शिवाजी पार्कवरची तोफ धडाडली आणि त्याचे पडसाद उमटले नाहीत, असं कधी होईल का? राजकारणात क्रियेला प्रतिक्रिया ही येतेच, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कालच्या सभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत अदानी समूहाचा (Adani Group) ‘पंचनामा’ केला आणि आता भाजपकडून पहिला जोरदार वार झालाय. भाजपचे फायरब्रँड नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी एका ट्विटद्वारे थेट ठाकरे बंधूंवर निशाणा साधला आहे.

Nitesh Rane vs Raj Thackeray BMC Election 2026

“ठाकरेंना अदानी नको, पण…”

राज ठाकरेंनी सादर केलेल्या अदानींच्या व्हिडीओ प्रेझेंटेशनवर नितेश राणे यांनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, “ठाकरेंना अदानी चालत नाहीत. पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो. मुंबईकरांनी सावध राहिले पाहिजे.” राणेंच्या या विधानाने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांनी या वादाला आता वेगळा राजकीय आणि सामाजिक रंग दिल्याचे दिसत आहे.

नेमकं काय होतं व्हिडीओमध्ये? कालच्या सभेत राज ठाकरेंनी २०१४ ते २०२४ या काळात अदानींची संपत्ती आणि प्रकल्प कसे वाढले, याचा नकाशाच मांडला होता. “अदानी कधी सिमेंट उद्योगात नव्हते, पण आज ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सिमेंट उत्पादक आहेत. मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ त्यांच्या घशात घातले, आता वाढवणही त्यांनाच मिळणार,” असा गंभीर आरोप राज यांनी केला होता. “मी उद्योजकांच्या विरोधात नाही, पण एकाच माणसाला देश विकण्याला माझा विरोध आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

आता राज यांच्या या अभ्यासू मांडणीवर भाजपने थेट न बोलता ‘मुलतानी आणि ममदानी’चा उल्लेख करत तोफ डागली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2026) तोंडावर हा ‘अदानी विरुद्ध मुलतानी’ वाद अधिक पेटण्याची चिन्हं आहेत. आता यावर मनसे किंवा ठाकरे गट काय उत्तर देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या

⚠️ बातमी पूर्ण दिसत नाहीये?

चांगल्या अनुभवासाठी Chrome/Safari मध्ये उघडा.

👉 Chrome मध्ये उघडा (Click Here)