Share

उद्धव ठाकरेंनी साडी नेसली, बुरखा घातला…; भाजपच्या आमदाराकडून वादग्रस्त व्यक्तव्य

तुझ्या मालकाने कितींदा वेशांतर केलं आहे, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून याचे पण काही संदर्भ आम्ही द्यायचे का? । Nitesh Rane Sanjay raut Uddhav Thackeray ajit pawar eknath shinde devendra fadnavis

Published On: 

Nitesh Rane Sanjay raut Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वेशांतर करुन गाठी भेटी घेण्याच्या मुद्यावरुन संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती. तुम्ही खोटी नावं, खोटी वेशांतरे करुन फिरत आहात. ही सर्व वेशांतर करणाऱ्या अल रशिदची पोरं असल्याचेही राऊत म्हणाले होते.

वेशांतर करणाऱ्यांचे खोटे पॅन कार्ड बनवले गेले. खोटी आधार कार्ड बनवली गेली आहेत. त्यांना सुरक्षीत बाहेर पडता यावं म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सुचना असाव्यात असा आरोपही राऊतांनी केला. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काय करत होते? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

चोरानं चोरासारखं वागावं, ज्यांनी गुन्हा केलाय, त्यांनी तोंड लपवतच फिरलं पाहिजे ही आमची भुमिका असल्याचे राऊत म्हणाले. गद्दाराने उगीच स्वाभिमानी आणि इमानीचा आव आणून फिरु नये, असे संजय राऊत म्हणाले होते.

यावर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले” उद्धव ठाकरे हे बहूरुपी आणि फिरतं नाट्य मंडळ आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरून नाटकच सुरू असल्याचे म्हणत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.

तसेच संजय राऊत यांच्यावर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘तुझ्या मालकाने कितींदा वेशांतर केलं आहे, कधी साडी घालून किंवा कधी बुरखा घालून याचे पण काही संदर्भ आम्ही द्यायचे का? आता हिंदुत्वाचं जे नाटक तुझा मालक करतो आहे तो बुरखा आम्हाला कधीतरी फाडावा लागेल. तुझा मालक किती वेळा बुरखा घालून हाजी अलीला जाऊन आलेला आहे. ही माहिती आणि फोटोग्राफ कधीतरी महाराष्ट्राला आम्ही दाखवू’, असे म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही