Share

“आरोपींना अटक झाल्याशिवाय हलणार नाही”, अमोल मिटकरींचे मुलगी, भावासह पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन

Amol Mitkari’s criticism of MNS president Raj Thackeray sparked anger among the workers and his car was attacked. After this attack, controversy has increased in MNS NCP

Published On: 

Amol Mitkari protested in front of the police station along with daughter

Amol Mitkari । अजित पवार (Ajit Pawar) गटाचे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्याविरोधात मनसेची आक्रमकता वाढली आहे. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आणि त्यामुळे त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर आता मनसे राष्ट्रवादीत वाद वाढला आहे.

याप्रकरणी कारवाई करण्यास पोलीस हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. त्याचबरोबर सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करत अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमोल मिटकरी यांनी मुलगी आणि भावासोबत आंदोलन केले आहे. आम्हाला अशा हिंसाचाराची अपेक्षा नव्हती, असे ते म्हणाले आहेत.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे मनसे कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल झालेल्या १३ पैकी ३ आरोपींना जमीन मंजूर झाला आणि अजूनही चार जणांना ताब्यात घेण्यात आलेले नाही. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत मिटकरींकडून आंदोलन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही